बिबी ग्रामपंचायतीचे आयोजन
लोकदर्शन👉 मोहन भारती
कोरपना – जिल्हा स्मार्ट ग्राम बिबीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या विविध गावातील 75 वर्षावरील 75 जेष्ठ नागरिकांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक गुलाब काकडे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून आनंद पावडे, बापूजी पिंपळकर, श्रावण चौके, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर आस्वले, पोलीस पाटील राहुल आसुटकर, माजी उपसरपंच आशिष देरकर, पांडुरंग लेडांगे, माजी सरपंच संतोष पावडे, ग्रामविकास अधिकारी धनराज डुकरे, शेख रशीद, पुंडलिक मोरे, देवराव ढेंगळे, भानुदास मोतेवाड, शेख पापा, किसन भडके यांचेसह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने ग्रामविकास अधिकारी धनराज डुकरे यांचा आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन विठ्ठल टोंगे यांनी केले. प्रस्ताविक पोलीस पाटील राहुल आसुटकर यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी धनराज डुकरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.