लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे
उरणमध्ये शिवसेनेला पहिला धक्का
उरण दि 17ऑगस्ट
ठाकरे – शिंदे गट भविष्यात एकत्र येण्याची शक्यता धूसर होऊ लागल्याने अखेर व्दिधा मनस्थितीत सापडल्याचे कारण देत शिवसेनेचे नवघर गटातील राजिप सदस्य विजय भोईर यांनी सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.यामुळे उरण तालुक्यात अभंग राहिलेल्या सेनेला पहिला धक्का बसला असून तालुक्यात खळबळ माजली आहे.
राज्यातील सत्तेवर येण्यासाठी ठाकरे- शिंदे अशी विभागणी झाली आहे.सत्तेसाठी पक्षातच पडलेली फुट निष्ठावंत शिवसैनिकांच्या अगदी जिव्हारी लागली आहे.त्यामुळे दोन्ही गटात समझोता घडून एकत्रित येतील अशी आशा शिवसैनिकांना लागुन राहिली होती.मात्र जशी वेळ निघून जात आहे तशी ठाकरे- शिंदे गटात समेट घडण्याची शक्यता दिवसेंदिवस धूसर होत चालली आहे.त्यामुळे सध्याच्या राजकीय स्थीतीमुळे शिवसैनिक व्दिधा मनस्थितीत सापडले आहेत.
त्यांना राजकीय भवितव्यही अंधारमय दिसू लागले आहे.दोन्ही गटात विनाशाकडे जाण्याची तसेच एकमेकांचे कपडे उतरविण्याची जणू प्रचंड स्पर्धा लागलेली आहे. दोन्हीकडून हाराकिरी करण्यासाठी उभ्या ठाकलेल्या सेनापती व सरदारांनाही त्याची जाणीव राहिलेली नाही.त्यामुळे भविष्यात समेटाची सुतराम शक्यता नाही.त्यामुळेच व्दिधा मनस्थितीत आलो असुन विचारांचे व्दंद व निष्ठेची घालमेल असह्य होऊ लागली आहे.या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजिनामा देत असल्याच्या भावना विजय भोईर यांनी राजीनामा पत्रात व्यक्त केल्या आहेत.ठाकरे-शिंदे यांच्यातील फाटाफुटीनंतरही उरण तालुक्यात शिवसेना अभंग राहिली होती.अभंग राहिलेल्या सेनेला पहिला धक्का बसला असून तालुक्यात खळबळ माजली आहे.