लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घेतले पाहिजे हे ध्येय लक्षात ठेवत अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाऊंडेशन, आवारपुर यांनी “हर घर तिरंगा” या कार्यक्रमाचे औचित्य साधत सभोवतालील एकूण आवारपूर, बिबी,नांदा, नोकारी, पालगाव, राजुरगुडा, कोल्हापुरगुडा, तळोधी, बाखर्डी, भोयेगाव, हिरापूर व सांगोळा अशा १२ गावातील २४ गरजू विद्यार्थ्यीनीना सायकलचे वाटप केलेत या सायकलचा वापर त्यांना शाळेत ये-जा करण्याकरता होईल.
या कार्यक्रमाला युनीट हेड, श्रीराम पी. एस., उप विभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक, फंक्शन हेड, गौतम शर्मा, सौदीप घोष, संदीप देशमुख, ललित देवपुरा, सुधा श्रीराम, दिव्या शर्मा, पल्लवी घोष, देवपुरा मॅडम तसेच सर्व डिपार्टमेंट हेड आणि ए.बी.पी.एस.स्कूल प्रिन्सिपल, सर्व गावचे सरपंच प्रियांका दिवे, आवारपूर, सुनीता तुमराम, हिरापूर, संजना बोंडे, सांगोडा, संगीता मडावी, नोकारी, ज्योती जेनेकर, तळोधी, शालीनी बोंडे, भोयगाव व पालगांव येथील ग्राम पंचायत सदस्य अनील आत्राम उपस्थित होते.
युनिट हेड, श्रीराम पी.एस. यांनी बोलतानी म्हटले की, शिक्षणा करीता आम्ही सभोवतालील गावाना नेहमी मदत करण्यास तत्पर राहु.
या कार्यक्रमाचे आयोजन कर्नल दिपक डे यांच्या मार्गदर्शनात सी.एस.आर. प्रमुख सतीश मिश्रा, सचिन गोवारदीपे, संजय ठाकरे व देविदास मांदाळे यांनी अथक प्रयत्न केले.