भारतीय विद्यार्थी मोर्चातर्फे मुख्यमंत्री कार्यालयाला रिकामी थाळी भेट करून महाराष्ट्र राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

 

लोकदर्शन 👉 किरण कांबळे

कोल्हापूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची रक्कम मागील १ ते १.५ वर्षापासून शासनाकडून प्रलंबित असल्याने अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज कोल्हापुरातून भारतीय भारतीय विद्यार्थी मोर्चाकडून मुख्यमंत्र्यांना थाळी भेट आंदोलन करण्यात येऊन राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. सुनील नागदिवे, धनु धम्मरक्षी, अनिल नागदिवे, आकाश कांबळे आदी स्वाधार विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध प्रवर्गातील ११वी १२ वी आणि व्यवसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या आणि शासकीय वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वस्तीगृहाप्रमाणे भोजन, निवास, निर्वाह भत्ता देण्यासाठीची शासन योजना आहे. परंतु हीयोजना केवळ सरकारी कागदावर अडकून पडल्याचे मागील १ ते १.५ वर्षात दिसून आले आहे.

 

आपल्यासाठी ही केवळ एक योजना असेल परंतु, सर्वसामान्य विद्यार्थी जो दुर्बल व आर्थिक घटकातील आहे त्याच्यासाठी हे शिक्षण घेताना मूलभूत गरजा भागवण्याचे एक माध्यम आहे. परंतु असे असताना देखील सरकारकडून विद्यार्थ्यांना मागील १ ते १.५ वर्षापासून योजनेची रक्कम मिळाली नाही असे निषेध पत्रात म्हटले आहे.

या परिस्थितीत विद्यार्थी कर्ज काढून घर-भाडे शैक्षणिक साहित्य ,खानावळ आणि पुस्तकांचा खर्च करीत आहेत. पालकांची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे हा खर्च विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक पालकांच्या नोकर्‍या गेल्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे.

 

तसेच पालकांवर येणारा ताण बघून विद्यार्थ्यांची मानसिक खच्चीकरण होऊन ते नैराशाकडे वळत आहेत. २०१८ मध्ये अशाच एका घटनेतून योगेश पावरा सारखा अभ्यासू विद्यार्थ्याने मानसिक तणावातून आणि शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे आत्महत्येसारखे पाऊल उचलले होते.

भविष्यात दुसरा कोणी योगेश पावरा घडू नये यासाठी आम्ही आपल्याला दि.३ ऑगस्ट २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातून प्रशासनाच्या माध्यमातून आपणांस निवेदन दिले होते. या निवेदनामध्ये सांगितलं होते की येणार्‍या १५ ऑगस्टपर्यंत नमूद केलेली मागणी मान्य केली पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली पाहिजे, अन्यथा १६ तारखेला भारतीय विद्यार्थी मोर्चामार्फत थाळी भेट आंदोलन करून सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध केला जाईल.

 

दिलेल्या मुदतीमध्ये विद्यार्थ्यांची कोणतीही मागणी सरकारने पूर्ण केली नाही, त्यामुळे नाईलाजाने भारतीय विद्यार्थी मोर्चातर्फे दिलेल्या इशार्‍यानुसार सरकारच्या विरोधामध्ये कोल्हापूर येथुन थाळी भेट आंदोलन करण्यात आले. रिकाम्या थाळीसोबत आम्ही निषेधाचे पत्रही पाठवण्यात आले आहे. जेणेकरून पैशांच्या अभावी सरकारच्या माध्यमातून जेवणाची थाळी रिकामी ठेवली गेली, त्या रिकाम्या थाळीला बघून तरी सरकार जागे होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

आगामी काळात हे आंदोलन दडपण्यासाठी शासन-प्रशासनाचा गैरवापर केल्यास आणि मनमानी कारभार करून विद्यार्थ्यांची कुचेष्टा केल्यास भारतीय विद्यार्थी मोर्चातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र निषेध आंदोलन रस्त्यावर येऊन केले जाईल असा इशारा *भारतीय विद्यार्थी मोर्चाचे महाराष्ट्र राज्य महासचिव किरण कांबळे* यांनी दिला आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *