लोकदर्शन👉 मोहन भारती
राजुरा :– भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित सर्व संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ठिक ७.४५ वाजता संस्थेचे संचालक अभिजित धोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य, गीत, भाषण, कराटे स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच अखिल भारतीय विकास केंद्र औरंगाबाद तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत कलारत्न पुरस्कार चैतन्य रागीट, निहारीका पंजा, स्नेहा चौहान, जानवी पिदुरकर तर स्वच्छ लेखनासाठी कलाश्री पुरस्कार विधान बानकर, प्रिन्सी बारई, सृष्टी पुल्लेवाढ, निबंध स्पर्धेसाठी विद्याभुषण पुरस्कार आरूषी डवरे, भुवण कावळे, क्रांती लिहितकर यांना गौरविण्यात आले. आदर्श शाळा पुरस्कार इन्फंट कान्व्हेंट, आदर्श मुख्याध्याप मंजुषा अलोने, आदर्श शिक्षक नगमा अंसारी, वैशाली धानोरकर यांना देण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सचिव तथा माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, शंतनु धोटे, उज्वल धोटे, कल्याणी धोटे, इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन दिपक खाडे यांनी तर आभार प्रदर्शन राम सर यांनी केले.