लोकदर्शन 👉 मोहन भारती
*भर पावसात राजुरा काँग्रेसने पुर्ण केली आझादी गौरव पदयात्रा*
राजुरा :– राजुरा तालुका काँग्रेसच्या वतीने लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्याच्या हीरक महोत्सव वर्षानिमित्त राजुरा तालुक्यातील चुनाळा, बामनवाडा, राजुरा शहर आणि गांधी भवन राजुरा अशी आझादी गौरव पदयात्रा भर पावसात पुर्ण करून राष्ट्रीय काँग्रेसचा स्वातंत्र्य चळवळीतील संघर्ष, स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारकांचे बलिदान, या ७५ वर्षात देशाच्या विकासात काँग्रेसचे योगदान इत्यादी अनेक विषयांवर जनजागृती केली. या पदयात्रेचे वरील सर्व ठिकाणी स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले आणि उत्तम प्रतिसाद देत सहभाग घेतला. दिनांक ९ ते १५ आँगस्ट दरम्यान आमदार सुभाष धोटे यांनी स्वतः संपूर्ण राजुरा विधानसभा क्षेत्रात ७५ किलोमीटर पदयात्रा पुर्ण करून जनजागृती केली. हजारो कार्यकर्त्यांसह समस्त जनतेला भारत जोडो चा संदेश दिला. आज क्षेत्रातील या आझादी गौरव पदयात्रेचा समारोप गांधी भवन राजुरा येथे करण्यात आला.
राजुरा विधानसभा काँग्रेस द्वारा आयोजित आझादी गौरव पदयात्रे च्या समारोपीय सभेला संबोधित करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग आणि बलिदानातून भारताला स्वातंत्र्य मिळाले. आणि महान देशभक्त नेते , सर्व सामान्य नागरिकांच्या परिश्रमाने हा देश सुजलाम, सुफलाम, मजबूत आणि बलशाली बनला आहे. तेव्हा स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणासोबतच देशात धर्म, पंथ, जात, भाषा, प्रांत व सामाजिक तेढ निर्माण करून विध्वंस माजविणाऱ्या शक्तींचा, विचारांचा प्रतिकार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे.
या प्रसंगी काँग्रेसचे विधानसभा समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा नम्रता ठेमस्कर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, चंद्रपूर ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे, कार्याध्यक्ष एजाज अहमद, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कविता उपरे, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष दिनकर कर्णेवार, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, माजी जि प सदस्य मेघाताई नलगे, माजी सभापती कुंदाताई जेणेकर, निर्मला कुडमेथे, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष मंगेश गुरणुले, राजुरा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ईरशाद शेख यासह मोठ्या संख्येने काँग्रेसच्या सर्व विभागाचे, शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.