जलयुक्त शिवार २ प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घ्यावा संजय शिंदे

 

लोकदर्शन 👉 राहुल खरात

बीड ;

मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री व जलसंधारण सचिव यांना पत्र पाठवून जलमित्र पुरस्कार प्राप्त संजय शिंदे यांनी मागणी केली आहे. त्यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, सन २०१५ ते २०१९ या कालावधीत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये काही त्रुटी, बदल आहेत ते दुरुस्त करून जलयुक्त शिवार अभियान २ हे राबविण्याचे आपण ठरविलेले आहे. आपण एक चांगली योजना राबविण्याचे ठरविलेले आहे त्याबद्दल आपले व आपल्या मंत्रिमंडळाचे हार्दिक अभिनंदन. आपले सरकार त्याचे धोरण ठरविण्याच्या तयारीला लागलेले आहे हे पाहून आंनद झाला. त्यासाठी पहिली बैठक हिवरे बाजार येथे आदरणीय डॉ. श्री. एकनाथरावजी डवले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ७ ऑगस्ट २०२२ रोजी संपन्न झालेली आहे. यामध्ये मागील कामातील त्रुटी, करावयाची कामे, कालावधी, अंमलबजावणी यावर दिवसभर विचारमंथन झालेले आहे.

जलयुक्त शिवार २ प्रभावीपणे राबविण्यासाठी अंमलबजावणीत सामाजिक संस्थांचा सहभाग असणे गरजेचे वाटते. कारण सामाजिक संस्था जन जागृती करून काम करतात तसेच लक्ष गट यांना सक्षम करण्याचे काम करतात त्यामुळे कामात लोक सहभाग वाढतो व योजना शाश्वत राबविली जाते. म्हणून शासनाने या योजनेत प्रत्यक्ष अंमलबजाणीसाठी सामाजिक संस्थांना कमीत कमी ५० टक्के सहभागी करून घ्यावे आणि क्षमता बांधणीचे १०० टक्के कामे द्यावीत.

मागील अभियानात शासनाने अंमलबजावणीसाठी सामाजिक संस्थांचा सहभाग घेतलेला नव्हता. सर्वच्या सर्व कामे ठेकेदारी पद्धतिने राबविल्याने कामे अर्धवट झाली, भ्रष्टाचार झाला, कामाचा दर्जा घसरला, बोगस काम झाली हे टाळण्यासाठी सामाजिक संस्थांचा सहभाग घ्यावा अशी महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांची मागणी आहे.

संस्थांचा सहभाग घेत असताना त्यामध्ये खर्चिक भागीदारी असणे तेवढेच गरजेचे आहे. यापूर्वी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना मध्ये अखर्चिक सहभाग घेण्याचा शासनाने शासन निर्णय काढल्याने महाराष्ट्रातील संस्थांनी त्यामध्ये सहभाग घेतलेला नाही. त्यामुळे मनरेगाची कामे रेंगाळलेली आहेत. हे सर्व पाहता सामाजिक संस्थांना जलयुक्त शिवार २ मध्ये प्रशासकीय खर्च देवून अंमलबावणीत सहभागी करून घेतल्यास योजनेला मोठा हातभार लागेल व योजना प्रभावी व यशस्वी राबविली जाईल. तरी आपणास विनंती आहे की, सामाजिक संस्थांना जलयुक्त शिवार २ मध्ये प्रभावी अंमलबजावनीसाठी सहभागी करून घ्यावे.

संजय ज्ञानोबा शिंदे
महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार प्राप्त
(महाराष्ट्र शासन- जलयुक्त शिवार अभियानचा सन २०१५ चा प्रथम पुरस्कार )
तज्ञ सदस्य – बीड जिल्हा जलयुक्त शिवार अभियान समिती
सदस्य – बीड जिल्हा जल साक्षरता समिती
मो. ९८५०५२३९६९

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *