लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि. 11 ऑगस्ट भारतीय सणांपैकी महत्त्वाचा व पवित्र सण म्हणून गणेशोत्सव सर्वत्र भारतात प्रसिद्ध आहे. यंदा बुधवार 31 ऑगस्ट 2022 रोजी गणेशोत्सवाला सुरवात होणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी गणेशोत्सव मंडळांना व घरगुती गणेशोत्सव साजरे करणाऱ्या भाविक भक्तांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरे करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे सर्वांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा या उद्देशाने, पर्यावरणाचा संरक्षण व्हावे हा हेतू समोर ठेवून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उरण तालुका मर्यादित ‘पर्यावरणपुरक गणेशोत्सव स्पर्धा 2022’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा उरण तालुक्या पुरता मर्यादित आहेत. फक्त उरण तालुक्यातील नागरिकांना,भाविक भक्तांना या स्पर्धेत भाग घेता येईल.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी प्रथम, द्वितीय तृतीय व दोन उत्तेजनार्थ असे बक्षीसे तर घरगुती गणेशोत्सवासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ बक्षीसे असे एकूण 10 बक्षीसे आहेत.बक्षीसपात्र प्रथम द्वितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ गणेश मंडळाना व बक्षीसपात्र प्रथम द्वितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ घरगुती गणेशोत्सवांना सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.सार्वजनिक मंडळांनी व घरगुती गणेशोत्सव साजरे करणाऱ्या भाविक भक्तांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा फोटो काढून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील व्हाट्सअप नंबर 8097100073,संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे 9702751098 या व्हॉट्सअप नंबर वर पाठवावे. सदर गणेशोत्सव हा पर्यावरण पूरक, नैसर्गिक असावा. पर्यावरण विषयी जनजागृती करणारा असावा. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी व घरगुती गणेशोत्सव साजरे करणाऱ्या भाविक भक्तांनी या पर्यावरणपूरक स्पर्धेत सहभागी होऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. असे आवाहन श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे यांनी केले आहे.