जिल्हास्तरीय द्रोणागिरी फुटबॉल स्पर्धेचे महादेव घरत यांच्या शुभहस्ते उद्‌घाटन

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि. 12 ऑगस्ट राज्यातील खेळाडुंना,त्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीकोनातून द्रोणागिरी स्पोर्टस असोशिएशनच्या वतीने रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान उरण शहर येथे आज दि 12 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हास्तरीय द्रोणागिरी फूटबॉल – 2022 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी या स्पर्धेचे उदघाटन द्रोणागिरी स्पोर्टस असोशिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांनी श्रीफळ वाढवून केले. यावेळी द्रोणागिरी स्पोर्टस असोशिएनचे खजिनदार शिवेंद्र म्हात्रे,सचिव दिलीप तांडेल,कामगार नेते महेंद्र सावंत,सल्लागार मणिराम पाटील,डोंगरी गावचे माजी सरपंच अनंत भगत,कबड्डी कोच आत्माराम घरत अंबादेवी डोंगरी संघाचे कर्णधार मंगेश घरत, शेकापचे माजी चिटणीस यशवंत ठाकूर,रायगड भूषण सई पाटील, शिवसेना द्रोणागिरी शाखा शहर प्रमुख जगजीवन भोईर,रायगड भूषण नरेश म्हात्रे,यूरोलॉजिस्ट डॉ आशिष पाटील यांच्या तेजनक्ष हॉस्पीटलचे डॉ. हंसराज जाधव, रेणूका साळुंके , डॉ. अश्विनी कोकरे व इतर परिचारिका आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

14 वर्षाखालील जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत 12 संघ व राज्यस्तरीय खुला गटात 16 संघ सहभागी झाले आहेत.सदर फुटबॉल स्पर्धा तीन दिवस चालणार आहे.खोपोली, अलिबाग, नवी मुंबई, मुंबई इत्यादी ठिकाणाहून स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.सदर फुटबॉल स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा विभाग प्रमुख भरत म्हात्रे, किरण घरत, जयेश पाटील, सचिन पाटील, मुकेश घरत,प्रवीण घरत, प्रकाश भोईर, विजय पाटील, सुनीत घरत, दिवेश घरत,रविंद्र पाटील,आकाश पाटील,ऍड मच्छिन्द्र घरत, द्रोणागिरी स्पोर्टसचे क्रिडा प्रशिक्षक प्रविण तोगरे, राम चव्हाण, विजय पाटील, संजीव पाटील यांनी हातभार लावला. राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा दिनांक 13 ऑगस्ट व 14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान येथे होणार असून राज्यस्तरिय फुटबॉल स्पर्धेचे बक्षीस पारितोषिकचे वितरण रविवार दि 14 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजता शिवराय चौक,नविन शेवा बीपीसीएल रोड,उरण येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा दिनांक 14/8/2022 रोजी सकाळी 7:30 वाजता नवीन शेवा, बिपीसीएल रोड येथे आयोजित केला असून या स्पर्धेत 4500 स्पर्धेकांची नाव नोंदणी झालेली आहे.या स्पर्धेला सर्व मान्यवरांनी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *