लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि 13 ऑगस्ट
जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेल व केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या कडून उरण तालुक्यातील पी पी मुंबईकर इंग्लिश स्कूल वेश्वि येथे वृक्षारोपण करण्यात आले.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त हर घर तिरंगा अभियानाचे औचित्य साधून गावातल्या लोकांना व आदिवासी बांधवांना ई श्रम कार्ड वाटप व झेंडे वाटप करण्यात आले. तसेच घरोघरी तिरंगा अभियानाविषयी जनजागृती करण्यासाठी गावात रॅली काढण्यात आली. टाकी गाव येथे उरण वनविभागामार्फत वृक्षारोपण व झेंडा वंदन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम दादा म्हात्रे, उरणचे नायब तहसीलदार नरेश पेढवी,तलाठी जामदंडे, महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर, इंग्लिश स्कूलचे चेअरमन चंद्रकांत मुंबईकर, कॉन अध्यक्ष स्नेहल पालकर,प्राचार्य प्रितम टकले,सरपंच संदीप कातकरी,अभय ठाकूर व ग्रामस्थ व आदिवासी बांधव उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जयदास ठाकरे यांनी केले.