लोकदर्शन👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदा येथील ग्रंथालय विभागातर्फे भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सचिव डॉ अनिल मुसळे, गुरुकुल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आशिष पईनकर, महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. सचिन करनेवार रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक, डॉ. राजेश डोंगरे, संदीप खिरटकर, प्रमोद वाघाडे, सचिन बोढाले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. अनिल मुसळे यांनी डॉ. एस आर. रंगनाथन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. प्राचार्य आशिष पईनकर यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. सचिन करनेवार तर आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत पुराणिक यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुशांत खिरटकर, संतोष चौधरी, प्रफुल मुसळे, प्रशांत नवले ,ननिता बुरान, सविन मडावी, शालिक कांबळे यांनी परिश्रम घेतले.