काँग्रेसच्या आझादी गौरव पदयात्रेला कोरपन्यात उत्स्फूर्त प्रतिसाद.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना :–
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार ९ ते १५ आँगस्ट या दरम्यान आझादी गौरव पदयात्रा काढून स्वातंत्र्य सैनिक, महान नेते, आजपर्यंत देशात झालेल्या विकास कामांचे गौरव आणि संवाद साधून जनजागृती करण्यात येत आहे. आज लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात कोरपना तालुक्यातील सद्गुरू जगन्नाथ बाबा तुकडोजी नगर येथून पदयात्रेला सुरूवात करण्यात आली. यानंतर तांबोळी, गांधीनगर, कोडशी बु. , कोडशी खु., हेटी, शेरज, माथा, लोणी, पिपरी इत्यादी गावांमध्ये पदयात्रा करून नारंडा येथे समारोप करण्यात आला.
या प्रसंगी हेटी वरून शेरज ला जाताना आमदार सुभाष धोटे यांनी चक्क नाल्याच्या पाण्यातून वाटचाल करीत पदयात्रा पुर्ण केली. वरील सर्व गावांमध्ये पदयात्रा काढून ७५ स्वातंत्र्यदिनाचा जयघोष केला, देशाच्या महानायकांचे विचार, स्वातंत्र्य चळवळ, देशाच्या विकासासाठी काँग्रेसचे योगदान याविषयी जनजागृती केली.
या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, माजी जि प सदस्य उत्तमराव पेचे, सीताराम कोडापे, दिनकर पाटील मालेकर, माजी सभापती श्यामभाऊ रणदिवे, माजी उपसभापती संभाजी कोवे, भाऊराव चव्हाण, सुरेश पा मालेकार, घनश्याम नांदेकर, गणेश गोडे, रोशन आस्वलें, उपाध्यक्ष ईसमाईल भाई, मनोहर चन्ने, नगर सेवक नितीन बावणे, निसार भाई, राहुल मालेकर, विलास आडे, दिलीप दरणे, अनिल गोंडे, सचिन मालेकर, वामन मुसळे, प्रमोद पिंपळशेंडे, मुर्लीधर लोडे, प्रशांत लोडे, विलास मडावी, रोशन मरापे, स्वप्नील माणूसमारे, तुळशीराम कोल्हे, विठ्ठल मुके, अविनाश गोरखार, पुंडलीक गिरसावळे, राजु ठाकरे, घनश्याम काळे, हरिदास ताजने, सूरज निमसरकर, आकाश शेंडे, रवींद्र नांदेकर, बंडू पिदुरकर, विश्र्वास मालेकर, सचिन मालेकर, भाऊराव बोर्डे सुभाष पा मालेकर, जगन पा ताजने, रामचंद्र पायताडे, विठोबा गुरणुले, धामोदर टोंगे यासह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कांग्रेसप्रेमी नागरिकांनी उत्सफूर्त सहभाग घेऊन पदयात्रा यशस्वी केली.