लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे
उरण दि 7 ऑगस्ट स्वातंत्राच्या अमृत महोत्सवा निमित्त उरण तालुक्यातील वशेणी गाव पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण व्हावा आणि नागरिकांना स्वच्छ व शुध्द पाणी मिळावे म्हणून नुकताच वशेणी ग्रामपंचायत यांच्या सौजन्याने जलशुद्धीकरण (आर ओ)प्लान्टचा शुभारंभ गावचे सरपंच जीवन गावंड यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे कार्यवाहक मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी केले. या वेळी गावच्या सरपंचाचे विचार जर सकारात्मक आणि धोरणात्मक असतील तर गावचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. असे मच्छिन्द्रनाथ म्हात्रे यांनी सांगितले. सकारात्मक व धोरणात्मक विचार करणारे सरपंच जीवन गावंड यांनी वशेणी ग्रामस्थांसाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारल्या बद्दल त्यांचे अभिनंदन आणि कौतुक करण्यात आले.
यावेळी वशेणी ग्रामपंचायत सदस्य संदेश गावंड, कृष्णा ठाकूर,शोभाताई पाटील जे.व्ही .ठाकूर, गावचे पोलिस पाटील दिपक म्हात्रे सुनिल ठाकूर, महेंद्र पाटील, बी.जे.म्हात्रे, संतोष म्हात्रे, पुरण पाटील, सौदागर गावंड ,अविनाश पाटील,समीर म्हात्रे, तेजस म्हात्रे,अभिजित गावंड ,धर्मेंद्र तांडेल,विलास गावंड,पंकज पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
ग्रामपंचायत सदस्य संदेश गावंड यांनी ही योजना आपली घरातली समजून तीची देखभाल ग्रामस्थांनी करावी. असे आवाहन उपस्थित ग्रामस्थांना केले.या वेळी बी.जे.म्हात्रे आणि जे.व्ही.ठाकूर यांनी आपल्या मनोगतातून सरपंच जीवन गावंड आणि ग्रामपंचायतीचे कौतुक केले.
या प्लान्टचा शुभारंभ करताना सरपंच आपल्या मनोगतात म्हणाले की गावाचा विकास जरी आमच्या ध्येय धोरणावर अवलंबून असला तरी ग्रामस्थांचे सहकार्य सर्वच गोष्टीत अपेक्षित असते असेच सहकार्य या जलशुद्धीकरण( आर ओ) प्लान्ट साठी ग्रामस्थांनी केले खास करून आर ओ प्लान्ट साठी सुनिल ठाकूर यांनी खूपच सहकार्य केले.असे सहकार्य युवा वर्गातून होत राहिले तर गावाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही.शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.