लोकदर्शन👉 मोहन भारती
राजुरा (ता.प्र) :– अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या निर्देशानुसार लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय राजुरा येथे राजुरा तालुका काँग्रेस च्या वतीने तर गोंडपिपरी, कोरपना, जिवती येथे तालुका काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल, एलपिजी गॅस, खाद्यतेलासह अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वारेमाप दरवाढ करून गोरगरीब, सर्वसामान्य जनतेची लूटमार करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारच्या महागाई विरोधात, बेरोजगारी व सैन्य भरतीच्या तरुणांना नुकसानकारक ठरणाऱ्या अग्नीपथ योजनेच्या विरोधात तसेच जीवनावश्यक वस्तूवरील वाढवलेल्या जी. एस. टी च्या विरोधात एकदिवसीय धरणे आणि जेलभरो आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने महागाई कमी करावी, अग्नीपथ योजना मागे घ्यावी, गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी करणारे निवेदन तहसीलदार हरिष गाडे यांच्या माध्यमातून महामहिम राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले. या प्रसंगी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको करून जेलभरो आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा करण्यात आल्या. आमदार सुभाष धोटे सह काँग्रेस च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अटक करून घेतली. या आंदोलनात स्थानिक महिला, युवकांनी हजारोंच्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
या प्रसंगी काँग्रेसचे विधानसभा समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कविता उपरे, काँग्रेस ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्णेवार, सं गां नि योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मंगेश गुरणुले, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, अशोकराव देशपांडे, माजी सभापती सदस्य कुंदा जेणेकर, मुमताज जावेद अब्दुल, निर्मला कुडमेथे, माजी प स सदस्य तुकाराम मानुसमारे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष गटलेवर, राजुरा काँग्रेसचे कार्याध्यक्ष एजाज अहमद, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ईरशाद शेख, शहराध्यक्ष अशोक राव, शंकर गोनेलवार, नानाजी आदे, हरिचंद्र जूनघरे, सुधाकर उईके, अजय रेड्डी, भाग्यश्री आत्राम, श्यामराव कोटनाके, जंगू येडमे शंकर बोंकुर, अब्दुल जमीर, प्रभाकर येरणे, अविनाश जेनेकर, गोपाल बुरांडे, प्रणय लांडे, विनोद कावडे, उमेश गोरे, अॅड चंद्रशेखर चांदेकर, शिवराम लांडे, रामभाऊ ढुमने, अमित टेकाम, जगदीश बुटले, पंढरी चंन्ने, आकेश चोथले, योगिता भोयर, ज्योती शेंडे, पुनम गिरसावळे, इंदूताई निकोडे, यासह तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल काँग्रेस, युवक काँग्रेस, अनुसूचित जाती व जमाती विभाग काँग्रेस, अल्पसंख्यक विभाग काँग्रेस, ओबीसी काँग्रेस, एनएसयूआय अशा काँग्रेसच्या सर्व विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.
गोंडपिपरी, कोरपना, गडचांदूर, जिवती येथे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, विठ्ठलराव थिपे, गणपत आडे, विजयराव बावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह केंद्र सरकारचा निषेध करून जेलभरो आंदोलन करण्यात आले.