तब्बल ६,२५८ रुग्णांची तपासणी
लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर
शनिवारी, ३० जुलै रोजी सकाळी
लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस येथील प्रयास सभागृहात भव्य मोफत रोगनिदान, शस्त्रक्रिया, चष्मे वाटप व भव्य महाआरोग्य शिबीर संपन्न झाले.
याप्रसंगी भारत मातेच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्ज्वलन करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले व कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूरचे मनपा आयुक्त राजेश मोहिते, वेकोलि वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे, एसीसी सिमेंट कंपनीचे प्लांटहेड अनिल गुप्ता, लॉयड्स मेटल्स कंपनीचे युनिटहेड संजय कुमार, उपाध्यक्ष प्रशांत पुरी, चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी आर. पी. गहलोत, डॉ. रवी अल्लूरवार, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अमल पोद्दार, डॉ. मंगेश टिपणीस, डॉ. सुशील मुंदडा, एसीसी कंपनीचे विजय खटी, वेकोलिचे संजय वैरागडे मंचावर उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. महाआरोग्य शिबीराचे उदघाटन चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
प्रास्ताविक करतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, लोकसेवेला समर्पित नेतृत्व म्हणजे सुधीरभाऊ मुनगंटीवार होय. लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार जनसेवेला वाहून घेणारे आहे. त्यांचा वाढदिवस गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सेवा दिन म्हणून साजरा करत आहो. यावर्षी सुद्धा हा सेवा दिन साजरा करण्यासाठी महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. मागील सात वर्षांपासून महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहो. घुग्घुस परिसरात लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे करण्यात आली आहे. कोरोना काळात दोन वर्ष आरोग्याची सुविधा देण्यात आली. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून गोर गरीबाला मदत करण्यात येत आहे. या शिबीरात चंद्रपूर, नागपूरच्या तज्ञ व नामांकित डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. डॉक्टर्स आणि त्यांच्या चमू याठिकाणी नागरिकांच्या सेवेसाठी आल्या होत्या. नेत्रतपासणी, लसीकरण, ईसीजी, त्वचारोग, दंतरोग, स्त्रीरोग, बालरोग, कर्करोग, न्युरो, अस्तिरोग यांपासून तर मॅमोग्राफी तसेच शिबीरात पहिल्यांदा हृदयाच्या तपासणीकरीता ईको कार्डीयोग्राफी मशीन आणल्या होत्या, अशा सर्व प्रकारच्या आजारांवर याठिकाणी आलेल्या नागरिकांना तज्ञ डाॅक्टरांकडून निःशुल्क औषधोपचार व मार्गदर्शन मिळाले. दरवर्षी प्रमाणे यंदाही या महाआरोग्य शिबीराचा घुग्घुस शहरातील हजारो नागरीकांना लाभ घेतला.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, वेकोलि वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
संचालन भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी केले.
यावेळी एकुण ६, २५८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. डोळ्यांची व इतर शस्त्रक्रिया २५६ रुग्णांची करण्यात येणार असून १,३७१ रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे तसेच हृदयाच्या व मोठया शस्त्रक्रिया ४४ रुग्णांच्या करण्यात येणार आहे.
यावेळी माजी जि. प. सभापती सौ. नितूताई चौधरी, माजी उपसभापती निरिक्षण तांड्रा माजी सरपंच संतोष नुने, माजी उपसरपंच संजय तिवारी, वाहतूक आघाडीचे विनोद चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, उत्तर भारतीय आघाडीचे रत्नेश सिंग, भाजपाचे राजेश मोरपाका, अजय आमटे, बबलू सातपुते, नकोड्याचे सरपंच किरण बांदूरकर, भाजयुमोचे अमोल थेरे, चिन्नाजी नलभोगा, मानस सिंग, श्रीकांत सावे, तुलसीदास ढवस, दिलीप रामटेके, प्रवीण सोदारी, सुरेंद्र भोंगळे, नितीन काळे, सुरेंद्र जोगी, विवेक तिवारी, विनोद जंजर्ला, हेमंत पाझारे, दिलीप कांबळे, वैशाली ढवस, सुचिता लुटे, पूजा दुर्गम, नंदा कांबळे, प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरणताई बोढे, शरद गेडाम, राजू डाकूर, गणेश खुटेमाटे, हेमंत कुमार, सागर तांड्रा व घुग्घुस शहरासह परीसरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
दरवर्षी प्रमाणे यंदाही महाआरोग्य शिबीराचा हजारो नागरीकांनी लाभ घेतला.