लोकदर्शन पुणे ;👉राहुल खरात
पुणे शहरातील सुप्रसिद्ध कवयित्री, धाडशी लेखिका अशी ओळख असलेल्या डाॅ. निता बोडके यांची मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेच्या पुणे शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
डॉ. निता बोडके यांनी अनेक विषयांवर आपले रोखठोक विचार मांडले आहेत. महिला सक्षमीकरण, मुल्यशिक्षण, कोविड 19 च्या काळात अनेक समस्यांवर त्यांनी विशेष आवाज उठवला होता , त्याची दखल संस्थेतर्फे घेण्यात आली. डॉ. निता बोडके यांच्या ” संघर्ष नियतीशी ”
या काव्य संग्रहाला वाचक, समीक्षक यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे देत आहेत.
डॉ. निता बोडके यांनी आज पर्यंत साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाची विशेष दखल घेऊन संस्थेच्या निवड समितीने पुणे शहर अध्यक्ष पदी नियुक्ती केल्याचे नुकतेच त्यांना अधिकृतपणे नियुक्ती पत्र देण्यात आले.
अ. भा. म. सा. मं. संस्थेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा जेष्ठ कवयित्री ललिता गवांदे यांच्या शिफारशी नुसार आणि संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट यांच्या आदेशानुसार डॉ. निता बोडके यांची पुणे शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी डॉ. निता बोडके म्हणाल्या की, मी मराठी भाषेची अस्मिता जोपासण्याबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचा नेहमीच प्रयत्न करीत राहीन.
पुणे शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल साहित्य वर्तुळात विशेष आनंद व्यक्त करण्यात येत आहे
त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यामध्ये प्रामुख्याने नाशिकच्या लेखिका नीलिमा जोशी, कोल्हापूरच्या रेखा दीक्षित, कराड चे लेखक विनायकराव जाधव, ज्येष्ठ कवी सुरेश लोहार, वर्धा येथील कवयित्री लता हेडाऊ, नागपूर येथील सिद्धार्थ कुलकर्णी, डॉ बळवंतराव भोयर, तसेच परभणी येथील डॉ संगीता आवचार, सोलापूर येथील डॉ रजनी दळवी, नांदेड येथील डॉ घनश्याम पांचाळ, उस्मानाबादचे सिद्धेश्वर कोळी , पुण्याच्या जयश्री श्रीखंडे,मधुरा कर्वे, ठाण्याचे विनोद मूळे, पालघरच्या नीता राऊत, जव्हारचे मधुकर भोये आदींचा उल्लेख करता येईल,
मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेचे कार्य पुढे नेण्याचे आणि नवोदित लेखकांना वाव मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील असे आश्वासन त्यांनी आमच्या प्रतिनिधीला उत्तर देताना सांगितले