लोकदर्शन 👉 महेश गिरी
शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक (माध्यमिक) आणि शिक्षण संचालक (प्राथमिक) यांना वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रस्ताव निकाली काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शिबीर लावावे, असे निवेदन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले होते त्याबद्दल पाठपुरावा म्हणून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन ची समस्त पदाधिकारी टीम श्री शिवराम घोती सर ( राज्याध्यक्ष) यांचा नेतृत्वात शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक नागपूर यांची भेट घेतली
नागपूर शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक श्री काटोलकर साहेब यांनी वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीचे प्रस्ताव निकाली काढण्याबाबत शिबिर सप्टेंबर 1 ते 3 दरम्यान लावली जाईल असे आश्वासन दिले व 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून त्याच दिवशी शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लावल्या जाईल असे आश्वासन दिले तसेच महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन सोबत शिक्षकांचं ईतर मागण्या संदर्भात एक सभा आयोजित करणार असे आश्वासन दिले समस्त पदाधिकारी यांनी साहेबांचे आभार मानले त्याप्रसंगी उपस्थित शिवराम घोती (राज्याध्यक्ष) महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन, गजानन टांगले (राज्य कोषाध्यक्ष), यशवंत कातरे (नागपूर विभागीय अध्यक्ष),प्रवीण भोगे (विभागीय उपाध्यक्ष, केशवानंद बमनोटे (विभागीय कोषाध्यक्ष), स्वप्नील गवई (विभागीय संघटक), कोहिनुर वाघमारे (नागपूर जिल्हा अध्यक्ष), महेश गिरी (नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष), देविदास येलूरे (जिल्हा कोषाध्यक्ष) उपस्थित होते