राष्ट्रपती पदी जनजाती समाजाच्या श्रीमती द्रौपदी मुर्मु विराजमान झाल्या बद्दल वनवासी कल्याण आश्रम तर्फे मिठाई वाटप

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 2 जुलै
वनवासी कल्याण आश्रम उरण तर्फे उरण मधील कोप्रोली, विंधणे, जांभुळपाडा,केळ्याचा माळ, चांदयली या अदिवासी वाडिंवर भारताच्या राष्ट्रपती पदी पहिल्यांदाच जनजाती(आदिवासी) समाजातील द्रोपदी मुर्मू जी या राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्यामुळे जनजाती समाजाचा गौरव झाला आहे.या उद्देशाने उरण तालुक्यातील जनजाती समाजाला त्यांच्या पैकीच असलेली सामान्य व्यक्ती शिकून एवढ्या मोठ्या पदावर पोहचू शकते हे माहीत करून देण्यासाठी,त्यांच्या आनंदात सहभागी होण्याच्या निमित्ताने मिठाई वाटप केले गेले.

भारत माता की जय ,वंदे मातरम ची घोषणा देत ऍड आकाश शहा यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली.अध्यक्ष मनोज ठाकूर यांनी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु जींचा जीवनपट थोडक्यात सांगितला.अपार कष्ट करून एक महिला पूर्ण कुटुंब ठराविक कालावधीत गमावूनही अध्यात्माच्या जोरावर पुन्हा स्वतःच्या पायावर उभी राहते.बी ए पर्यंत शिक्षण घेते.स्वतः शिक्षिका बनून आपल्या भोवतालच्या जनजाती समाजाला शिक्षित करण्याचे काम करते.प्रतिकूल परिस्थिती असून ही संघाचे काम करते.पुढे सदस्य, नगरसेवक, आमदार ,उत्कृष्ट संसद पटू म्हणून पुरस्कार घेते.पुढे मंत्री मंडळात वाणिज्य, परिवहन मंत्री होते. ते केवळ शिक्षणाच्या ,चिकाटीच्या ,आणि आत्मविश्वासाच्या जोरावर.पुढे त्यांना झारखंड च्या राज्यपाल पदी नियुक्त केले जाते.तसेच आज पहिल्या जनजाती समाजातील 15 व्या राष्ट्रपती म्हणून,देशाच्या प्रथम नागरिक म्हणून विराजमान झाल्या आहेत.हे आपल्या जनजाती समाजाला आदिवासी समाजाला माहीत असण गरजेचे आहे, आणि आपल्यातून ही अशी कर्तृत्ववान माणसे शिकून पुढे जावीत म्हणून हा कार्यक्रम वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र उरण तर्फे आयोजित केल्याचे मनोज ठाकूर यांनी सांगितले.

सुनंदा कातकरी यांनी मी देखील आपल्याच समाजातील असून परस्थिती ला तोंड देत मुलींना शिकवीत आहे.माझ्या मुली ग्रॅज्युएट झाल्या तश्याच आपल्या समाजातील इतर मुलींनी ही शिकावे. यासाठी वनवासी कल्याण आश्रम सर्वतोपरी आपणास मदत करत असते. आपल्या सारखे व्यक्ती देखील शिक्षण घेतल्याने असेच पुढे जाऊ शकतो असे सांगितले .

वामन भाउ यांनी कुठला ही वाईट प्रसंग आला तरी माननीय राष्ट्रपती मुर्मु जी अध्यात्माचा आधार घेऊन बाहेर पडल्या.तसेच आपणही व्यसनाच्या आहारी न जाता अध्यात्माचा स्वीकार करावा असे सांगितले.या प्रसंगी सामाजिक कार्यकते कै कान्हा कृष्णा पाटील परिवार सारसोळं,महेश बालदि मित्रमंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले.या प्रसंगी वनवासी कल्याण आश्रमाचे मनोज ठाकूर (अध्यक्ष),कुणाल सिसोदिया(सहसचिव),आकाश शाह( सदस्य ),रमेश फोफेरकर,दीपक गोरे,वामन म्हात्रे, सुनंदाताई वाघमारे, बेबीताई कातकरी यांनी विशेष मेहनत घेतली.उरण तालुका केमिस्ट असोसिएशनचे गिरीश परिहरिया,बळीराम पेनकर हे मान्यवर उपस्थित होते.आकाश शहा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.रमेश फोफेरकर यांनी उपस्थितांचे तसेच आमदार महेश बालदि यांनी मतदार संघातील वनवासी बांधवांसाठी फिरता दवाखाना व्हॅन सुरु केल्या बद्दल आभार मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *