लोकदर्शन 👉किरण कांबळे
दिनांक २५ जुलै २०२२ रोजी “आदिवासी विकास विभाग संचलित गौतम आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह गोरेगाव मुंबई (प.)” येथील आदिवासी विद्यार्थ्यांना प्रशासनाने दबाब निर्माण करून जबरदस्तीने वसतिगृह खाली करण्यास भाग पाडले. संबंधित प्रकरणाविषयी वसतिगृहाचे गृहपाल अजित कुलकर्णी याकडे विद्यार्थ्यांनी मदत मागितली असता त्यामार्फत विद्यार्थ्यांना आदिवासी जमातीवर जातीवाचक टोमणे मारण्यात आले. या सर्व प्रकरणाविषयी “भारतीय विद्यार्थी मोर्चा’ या बहुजन विद्यार्थ्यांच्या राष्ट्रव्यापी संघटनेच्या प्रतिनिधींनी आज थेट अप्पर आयुक्त आदिवासी विभाग ठाणे यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या समस्यांवर चर्चा करून मा.सुमित शिंदे (राज्य महासचिव हॉस्टेल एवं अभ्यासिका BVM महाराष्ट्र) यांच्या मार्फत आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
ज्यामध्ये महत्वाच्या मागण्या केल्या आहेत.
१.आदिवासी शोषित विद्यार्थ्यांना कमिश्नर यांनी सांगितल्याप्रमाणे दहा दिवसाच्या आत पर्यायी चांगल्या प्रकारची व्यवस्था करून द्यावी.
२. गृहपाल अजित कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचा वारंवार जातीवरून अपमान केल्यामुळे त्यांच्यावर एट्रोसिटी ऍक्ट नुसार कारवाई करून त्यावर गुन्हा दाखल करावा.
३. आदिवासी वस्तीगृहासाठी आदिवासी गृहपाल द्यावा.
वरील मागण्या जर पूर्ण करण्यास प्रशासन हलगर्जीपणा करत असेल किंवा अपयशी ठरत असेल तर याचे परिणाम भारतीय विद्यार्थी मोर्चा तर्फ़े संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात पहायला मिळतील व याला जबाबदार महाराष्ट्र सरकार आणि आदिवासी विकास विभाग असेल. अशा प्रकारे निवेदनामार्फत संघटनेकडून प्रशासनाला आवाहन करण्यात आलं आहे.
आयुक्तांच्या भेटीसाठी भारतीय विद्यार्थी मोर्चा सोबत अनेक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते ज्यामध्ये मा.किरण साळवी (जिलाध्यक्ष BVM ठाणे जिल्हाध्यक्ष), मा.शुभम बर्डे (जिल्हा कार्याध्यक्ष BVM ठाणे), मा.साजिद जहागिरदार (जिल्हाध्यक्ष BYM मुंबई), मा.प्रमोद साळवी (जिल्हा उपाध्यक्ष BBM मुंबई), मा.विकास साबळे, मा.प्रतीक जाधव तसेच वस्तीगृहातील विद्यार्थी आदित्य पाडवी, सतिश देसाई, मंजय पावरा, ब्रहम्हरी गावित, पंकज वसावे, कल्पेश मासमार इ. उपस्थित होते.