लोकदर्शन प्रतिनिधी👉श्री. हनुमंत सुरवसे
उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रकार जमिनीच्या वादा मुळे धमकी
उस्मानाबाद जिल्ह्यातील बामणी गावामध्ये हा प्रकार घडला असून श्रीमती मथुराबाई गणपत सुरवसे यांनी २ रुपये रोज रुपये कष्ट करून १९७९ साली ५६ गुंठे जमीन खरेदी केली होती, त्यावेळी त्यांना २ मुले, १ मुलगी व त्यांचे पती गणपत धोंडिबा सुरवसे यांचे १९७४ रोजी निधन झाले होते, अशा परिस्थिती मध्ये त्यांनी कष्ट करून ५६ गुंठे जमीन खरेदी केली होती, त्यावेळी घरातील मोठा मुलगा म्हणून ज्ञानेश्वर गणपत सुरवसे याच्या नावे करण्यात आली होती,सदर जमीन काही वर्षापासून नामदेव संभाजी लांडे यांना कसण्यासाठी दिली होती, तर काही कारणत्सव सदर जमीन मथुराबाई सुरवसे यांचा १ मुलगा राजकुमार सुरवसे व मुलगी सत्यभामा ढवन यांनी मथुराबाई सुरवसे यांना जमिनीची वाटणी मागितली, सदर जमीन ज्ञानेश्वर सुरवसे याच्या नावे असल्याने मथुराबाई सुरवसे यांनी ज्ञानेश्वर यास जमिनीची समान वाटणी करण्याबद्दल सांगितले तर ही जमीन माझी आहे ही मी कुणाला करून देणार नाही व माझ्या जमिनी मध्ये कोणी यायच नाही अशी उलट उत्तर देऊ लागला, या कारणाने मथुराबाई सुरवसे यांचा धाकटा मुलगा राजकुमार सुरवसे यांनी उस्मानाबाद कोर्टा मध्ये जमीन वाटून मिळाल्यासाठी दावा दाखल केला असून सदर दावा निर्णय कोर्टा मध्ये चालू असून ती आता अंतिम टप्प्यात आहे.
सदर जमीन काही काळ पडिक होती ती पडीक जमिनी मध्ये मथुराबाई सुरवसे यांनी सोयाबीन चे बी काही दिवसापूर्वी पेरले होते, तर ज्ञानेश्वर सुरवसे याने स्वतःच्या आईने पेरलेल्या पिकावर शनिवार दि. ३० जुलै २०२२ रोजी सायंकाळी च्या सुमारास सलगरे याचा ट्रॅक्टर आणून पूर्ण पिकाची नासधूस करून पुण्याच्या दिशेने पळ काढला.
मथुराबाई सुरवसे, सत्यभामा ढवन यांची साक्ष राजकुमार सुरवसे यांच्या बाजूनी असल्याकारणाने ज्ञानेश्वर सुरवसे हा मथुराबाई सुरवसे यांना तु माझी जमिनीची वाटणी करण्यासाठी का सांगत आहे, मी माझी जमीन कुणाला देणार आणि तु माझ्या जमिनीची वाटणी करायला सांगू नको नाहीतर मी तुला जीवे मारून टाकील तुझ्या राहत्या घराला जेसीबी नी उखडून टाकील व तुला जगू देणार नाही अशी धमकी दिली.
अशी धमकी दिल्या कारणाने मथुराबाई सुरवसे घाबरून गेल्या असून माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास यास ज्ञानेश्वर गणपत सुरवसे हा जबाबदार असेल असे त्यांचे म्हणने असून, त्यांनी भारतीय दंड संहिता १८६० कलम ५०४/५०६ अंतर्गत उस्मानाबाद मधील बेंबळी पोलीस ठाण्यामध्ये सहाय्य्क पोलीस निरीक्षक शेंडगे यांच्या आदेशाने एन.सी.आर. दाखल केला असून पुढील तपास सपोनि शेंडगे हे करीत आहेत.