सावित्रीबाई फुले विद्यालयातील जेष्ठ शिक्षक चंद्रकांत घाटे यांना भावपूर्ण निरोप

लोकंदर्शन👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,,
सावित्रीबाई फुले विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथील जेष्ठ शिक्षक श्री. चंद्रकांत जनार्दन घाटे नियत वयोमानानुसार प्रदीर्घ सेवेनंतर 3१ जुलै ला सेवानिवृत्त झाले .. त्या निमित्ताने शाळेत त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री धर्मराज रामकृष्ण काळे होते . प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख श्री पंढरी मुसळे व पर्यवेक्षक संजय गाडगे उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री धर्मराज काळे यांच्या शुभ हस्ते चंद्रकांत घाटे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री. केंद्रप्रमुख मुसळे , पर्यवेक्षक संजय गाडगे व सेवा जेष्ठ शिक्षक महेंद्रकुमार ताकसांडे यांनी चंद्रकांत घाटे यांच्या शैक्षणिक, सामाजिक, व कर्तव्यनिष्ठ कार्याची प्रशंसा करून भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या. चंद्रकांत घाटे यांनी यांनी सत्काराला उत्तर देताना शाळेबद्दल तसेच संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली,
कार्यक्रमाचे संचालन सेवा जेष्ठ शिक्षक महेंद्र कुमार ताकसांडे यांनी तर आभार कु. चटप मॅडम यांनी मानले
या प्रसंगी पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *