लोकदर्शन👉राहुल खरात
*पाणी लावून,*
*पाणी मागण्यापेक्षा,*
*पाणी दावून,*
*पाणी मागणार !*
या निर्धाराने अपक्ष म्हणून आमदारकी जिंकणारे,
मला पद – प्रतिष्ठा – सन्मान देणारे मंत्रीपद नको, फक्त माझ्या भागाला कृष्णामाईचे पाणी द्या ! अशी लक्षवेधी मागणी आमदारकीच्या एकाच टर्म मध्ये सत्यात उतरविण्यास भाग पाडणारे आमदार म्हणून ज्यांना लाखो लोक ओळखतात. टेंभू योजना रेकॉर्डवर आणून या योजनेच्या कर्जरोखे विक्रीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री महोदयांना आटपाडीत आणून टेंभूचे मोठे काम त्याच पाच वर्षात मार्गी लावणारे, स्वतः विद्यमान आमदार असतानाही ज्यांना पराभूत केले त्यांनाच पुढच्या निवडणूकीत निवडून आणणारे विशाल अंतःकरणाचे दैवी व्यक्तीमत्व म्हणून
*नाथाजीराव रस्तुमराव उर्फ राजेंद्रआण्णा बाबासाहेब देशमुख* या नावाला आजही स्वकीयां बरोबर विरोधक ही मोठ्या मनाने सलाम करतात .
प्रखर स्वाभीमानी, झुंझार व्यक्तीमत्व, लढावू नेते म्हणून खानापूर- आटपाडीवर वर्चस्व गाजविणारे कै . र . चि . उर्फ बाबासाहेब देशमुख यांचा वसा- वारसा जोपासणारे, हजारोंच्या घरात विकासाच्या माध्यमातून परिवर्तन आणणारे, सततच्या दुष्काळ आणि विरोधकांच्या टोकाच्या संघर्षाला तोंड देत मार्गक्रमण करणारे, मोडलो तरी चालेल पण कोणापुढे लाचार होणार नाही . या वज्रधारी निर्धारातून कोणत्याही आधाराशिवाय संस्था, उद्योग,संघटना चालवताना मोठ्या राजकीय हानीची, उदयोग, व्यवसाय अडचणीत येण्याची मोठी किंमत मोजणारे, तथापि सर्व संकट, समस्यांना हसतमुखाने सामोरे जाणारे , प्रचंड त्रास, संकटात संयम ढळू न देणारे , खानदानी राजेशाही ऐश्वर्यातही साधे राहणारे , दीन, दलित, अल्पसंख्याक, सर्वसामान्यांसाठी तिळतिळ तुटणारे , त्यांच्या प्रती नम्र राहणारे , शांतता संयमाने प्रत्येक पाऊल टाकणारे आणि याच ध्येय मंत्राने जीवन व्यतित करणारे, उच्च कोटीचे आदरणीय व्यक्तीमत्व म्हणून सांगली – सातारा – सोलापूर जिल्ह्यातील जनता ज्यांच्यावर अपार प्रेम करते . असे त्यागी ध्येयवेडे , शांत, संयमी नेत्याचा अर्थातच
*राजेंद्रआण्णा देशमुख*
यांचा आज वाढदिवस . या सच्च्या, सरळमार्गी, अजातशत्रु व्यक्तीमत्वास वाढदिवसाच्या करोडो शुभेच्छा. हा लोकनेता पुन्हा विधानसभा अथवा विधान परिषदेवर आमदार किंवा लोकसभा अथवा राज्यसभेवर खासदार म्हणून सन्मानीत व्हावा . एवढेच नव्हे तर १९९५ साली चालून आलेले तथापि भागाच्या पाण्यासाठी नाकारलेले मंत्रीपद, भविष्यात राजेंद्रआण्णा देशमुख यांना मिळावे, आणि हाच त्यांच्या राजकीय सामाजीक जीवनाचा खरा गौरव ठरावा . हीच विधात्याकडे आग्रही प्रार्थना !
*आण्णा,*
*तुम जियो हजारो साल,*
*साल के दिन पचास हजार !*
*जनमदिन मुबारक हो, सालगिराह मुबारक हो, शतकवीर बनो ।*
*सादिक खाटीक आटपाडी जि . सांगली .*
प्रदेश महासचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र .
प्रदेश कार्यकारणी सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र .