लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे
उरण दि 27. जुलै
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी उपसंचालक कृषी जिल्हा रायगड दत्तात्रय काळभोर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले व हिरवा झेंडा दाखवून प्रचार प्रसिद्धीच्या रथास 25 जुलै 2022 रोजी पासून सुरुवात करण्यात आली.उरण तालुक्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा शेतकऱ्या पर्यंत प्रचार आणि प्रसिद्धी व्हावी यासाठी दिनांक 26 जुलै 2022 रोजी तालुक्यामध्ये प्रचार आणि प्रसार करण्यात आला.यावेळी उपस्थित तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक यांच्यासह तालुका पीक विमा प्रतिनिधी उपस्थित होते.नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022-23 करिता उरण तालुक्यामध्ये भात या पिकासाठी राबवत आहे. या योजनेत सहभागी होण्याची मुदत 31 जुलै 2022 असून त्याला अवघे 4 दिवसाचा कालावधी शिल्लक असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.