लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे
उरण दि 27 जुलै उरण विधानसभा मतदार संघाचे दमदार आमदार महेशशेठ बालदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज कित्येक दिवस झाले उरण मतदार संघात विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जात आहेत.आमदार महेश बालदी यांनी वाढदिवसाच्या अगोदरच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांना जाहीर आवाहन केले होते की वाढदिवसाच्या वेळी कुणीही बॅनर, जाहिराती किंवा कोणतेही अनावशक्य समारंभ आयोजित करू नये.जे काही करायचे असेल ते समाजाच्या हिताच्या उपयोगी असेल असेच कार्यक्रम करावे.त्यामुळे आज जवळ पास दहा पंधरा दिवस विधानसभा मतदार संघात सर्वत्र समाजोपयोगी कार्यक्रम सुरू आहेत.त्याचाच एक भाग म्हणून आमदार महेशशेठ बालदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी खोपटाच्या वतीने आमदार निधीतून खोपटा गावात बांधपाडा अंतर्गत रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे (अंदाजित रक्कम १० लाख) भूमीपूजन भाजपाचे उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
दिनांक 26 जुलै रोजी आमदार महेश बालदी व रामशेठ ठाकुर विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा परिषद शाळा खोपटा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.तसे पाहिले तर आमदार महेशशेठ बालदी यांचे खोपटा गावावर विशेष प्रेम आहे.कारण खोपटा गावातील सुजाण जनतेने प्रथमच भारतीय जनता पार्टीला सरपंच पदाचा मान मिळवून दिला आहे.आणि त्याचीच थोडीशी परत फेड म्हणून सरपंच यांच्या मागणीला ताबडतोब प्राधान्य देत गावात 120 वर्षे शाळेची जुनी झालेली धोकादायक इमारत पाडून त्या जागी डीपी वर्ल्ड कंपनीच्या माध्यमातून जवळ पास 5 कोटी रकमेच्या नवीन शाळेचे भूमिपूजन करून काम ही सुरू केले आहे.असे ह्या विकास पुरुषाच्या वाढदिवसानिमित्त खोपटा गावातून त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.आमदार महेशशेठ बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याच्या उद्घाटन प्रसंगी तसेच शैक्षणिक कार्यक्रमा प्रसंगी भाजपा चे उरण तालुका अध्यक्ष रवीशेठ भोईर, सचिव सुनील पाटील, आमदार महेश बालदी यांचे स्विय सहाय्यक निखिल माळी, ज्येष्ठ पदाधिकारी चंद्रकांत घरत, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावड, विभाग अध्यक्ष शशी पाटील, खोपटा सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर, सदस्य अच्युत ठाकुर, हेमंत आत्माराम म्हात्रे, प्रदीप ठाकूर, विश्वास पाटील, किरण म्हात्रे, हरेश्र्वर म्हात्रे, जितेंद्र ठाकूर, प्रशांत ठाकूर, गाव अध्यक्ष नवनाथ ठाकूर, उपाध्यक्ष उत्कर्ष ठाकूर, सचिव अमित घरत,सदस्य देवानंद पाटील, सदस्य संदेश म्हात्रे, सदस्या मीनाक्षी म्हात्रे, हेमंत ठाकूर, सुगंधा कोळी, कलावती घरत, मालती पाटील,सुनीता घरत, सभापती मा.बबन ठाकूर, कमिटी मेंबर, शिक्षक वृंद, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यार्थी उपस्थित होते.