लोकदर्शनप्र👉तिनिधी स्नेहा उत्तम मडावी पुणे
शासन स्तरावरून उपेक्षित समाजाच्या उन्नतीसाठी अनेक कल्याणकारी योजना असल्या तरी त्या तळागाळातील उपेक्षित आणि दुर्लक्षित समाजापर्यंत पोहोचणे मोठे दुरापास्त असते व आहे.त्यातीलच पारधी समाजासह आदिवासी समाज व इतर भटका विमुक्त समाज हा वर्षानुवर्ष शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनेपासून वंचित राहिला असल्याची खंत उरळी कांचन, ( पुणे ) येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.
. भोसले यांनी पुढं म्हटलं आहे की या समाजाच्या थोडं फार शिकलेल्या व्यक्ती जरी नोकरी व्यवसायात असल्या तरी, ही संख्या अगदी नगण्य आहे. शहरात कमीआणि दुर्गम भागात अधिक अशा स्वरूपातील असलेला, या समाजाचा आज तागायत म्हणावा तसा विकास देखील झालेला नाही, यातील पारधी समाजाकडे इतर समाज गुन्हेगारीच्या माध्यमातून बघतो, हे अत्यंत चुकीचे आहे, समाजाने आता तरी या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, या समाजातील शैक्षणिक अभावामुळे मागासलेपणा अधिक असल्याने तथा समाजातील रूढी परंपरा आजही कायम असल्याने या समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावरून आणखी प्रयत्न होणे गरजेचे ठरत आहे.
. विश्वविख्यात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीनदुबळ्यांना त्यांचे हक्क व अधिकार प्राप्त करून देण्यासाठी घटनेमध्ये तरतूद निर्माण करत शोषितांच्या वंचितांच्या दुःख दूर करण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावले हे सर्वश्रुत आहे. म्हणूनच शासन स्तरांबरोबरच शिक्षित व्यक्ती यांनी पुढाकार घेऊन समाजात असलेले हे विदारक चित्र दूर करण्यासाठी प्रयत्नशील होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. सुनिल ज्ञानदेव भोसले यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न उचलण्यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत. त्याचबरोबर कोरोना काळामध्ये रुग्णांसाठी केलेली धावपळ, तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील व बॉलिवूड कलाकारांच्यासाठी या कालखंडामध्ये उठवलेला आवाज, तसेच सर्व स्तरातील लोकांच्यासाठी केलेली लोककल्याणकारी कामे त्यांच्या या समाजोपयोगी कार्याबद्दल, गेल्या अनेक वर्षापासून समाजाबरोबरच विविध क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन, त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यातही आले आहे, तर विविध क्षेत्रांमध्ये त्यांना उच्च पदी नेमणूक ही करण्यात आली आहे, सुनिल ज्ञानदेव भोसले यांना मिळालेल्या पुरस्कारांमध्ये राजा राम मोहन राय समाज रत्न पुरस्कार, तसेच आदर्श पत्रकारिता पुरस्कार, कोरोना योद्धा समाज रत्न पुरस्कार, युथ वर्ल्ड इंडियन आयकॉन अवॉर्ड, दिल्ली येथे सुर झंकार कल्चरल सोसायटी अँड सुरीली फाउंडेशन ऑर्गनायझेशन यांचे वतीने उत्कृष्ट राष्ट्रीय पत्रकार अवार्ड, राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न प्रेरणा पुरस्कार, वुमन पॉवर सोसायटी दिल्ली राष्ट्रीय गौरव पुरस्कार,अशा विविध पुरस्कार प्राप्त सुनिल ज्ञानदेव भोसले यांचे कार्य निश्चितच उल्लेखनीय असेच म्हणावे लागेल, आजही भटक्या विमुक्त समाजातील तसेच सर्व स्तरातील लोकांच्यासाठी धडपड करणारा योद्धा सुनिल ज्ञानदेव भोसले यांच्या रूपाने कार्यरत आहे.पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले यांना पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा