लोकदर्शन👉 मोहन भारती . नवयुकांनी पुढे येऊन शासकीय योजनांचा लाभ घेऊन स्वयंम रोजगार उपलब्ध करावा असे आवाहन श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांनी केले आहे. . कोरपना तालुक्यातिल अतिदुर्गम भागातील मानिकगडच्या पायथ्याशी वसलेल्या कोरपना तालुक्यातील निमनि येथिल सौ माधुरी दौ भोंगळे हिवरबन रोप वाटीका द्वारे संचालीत शेतकरी निखिल गजानन भोंगळे यांनी आपल्या शेतात राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत रोपवाटिका तयार करून या माध्यमातून मिर्ची, वांगी,टमाटर,कोबी, लसूण,कांदे तसेच इतर अनेक प्रकारच्या भाजी पाल्याचे व इतर रोपटे तयार करून योग्य दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे या प्रसंगी श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष, श्री सतीश भाऊ उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर, पुरुषोत्तम भोंगळे भाजपा तालुका उपाध्यक्ष,श्री हरिभाऊ घोरे भाजपा शहर महामंत्री गडचांदुर यांनी भेट दिली या प्रसंगी श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले निखिल भोंगळे यांनी रोपवाटिकेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध केला या द्वारे शेतकऱ्यांना स्वस्त दरात विविध प्रकारचे रोप मिळत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी तसेच तेलंगणा राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात रोप नेत असुन या माध्यमातून समाजसेवा सुद्धा होत आहे केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध योजना चालू असुन नवयुवकांनी पुढे येऊन विधीवध शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वयंम रोजगार उपलब्ध करावा असे आवाहन केले व निखिल भोंगळे यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या व इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या वेळी गावातील नागरिक उपस्थित होते
Related Posts
From Lokdarshan
निमणी येथे हर घर तिरंगा अभियान* २५ रुपयांत ग्रामसंघाकडून तिरंग्याचे वाटप
लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर:- ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत निमणी येथे ग्रामसंघाकडून हर घर तिरंगा स्टॉल लावण्यात आले. यावेळी सरपंच सीमा जगताप यांच्या…
From Lokdarshan