लोकदर्शन 👉 अशोक गिरी
पवनी:- मुंबई येथील पारिजात फाउंडेशन म्हणजे सुगंध जगण्यातला या सामाजिक संस्थेने कोरोनानंतर विद्यार्थी पुन्हा हसत खेळत शाळेत यावेत या उदात्त हेतूने ‘बैक टु स्कूल’ हा उपक्रम राज्यभर राबविला.शाळेतील जवळपास १४० विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल इतके स्कूल बैग, पेन्सिल,पेन, रंगपेटी, चित्रकला वही, वह्या, मोजपट्टी,खोडरबर, असे नानाविविध शालेय साहित्याचे वितरण केले.पारिजात फाउंडेशन म्हणजे सुगंध जगण्यातला या सामाजिक व सांस्कृतिक संस्थेने गेल्या दशकापासून ‘बैक टु स्कूल’ हा उपक्रम राबवित शिक्षण प्रवाहात आलेल्या गोरगरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देऊन त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत महत्त्वपूर्ण असे भरीव योगदान दिले आहे.सदर उपक्रमाचे संपूर्ण नियोजन साहित्य पैकींग, पार्सल वाहतूक व्यवस्था यशस्वीपणे सामाजिक उत्तरदायित्वातुन राबविण्यासाठी ‘पारिजात’ संस्थेचे कार्यकारी सदस्य गुरुदास बाटे, अमित शिवे, हर्षद ठाकरे व अन्य मान्यवर सदस्य मंडळी यांनी योगदान दिले आहे.शाळेतील उपक्रमशील तथा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक अशोक गिरी यांनी पारिजात या संस्थेशी संपर्क साधुन शाळेला एकुण सात गोण्या शालेय साहित्य मोफत प्राप्त करून दिले.ही संस्था शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देते.”या संस्थेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे” असे प्रतिपादन भंडारा जिल्हा मच्छीमार सहकारी संस्था जिल्हा अध्यक्ष प्रकाश पचारे यांनी केले.सदर साहित्याचे वितरण प्रकाश पचारे जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र ग्रामीण विकास शिक्षण संस्था खांबाडी बोरगावचे कोषाध्यक्ष भिमराव वहाने, उपाध्यक्षा तथा सावित्रीबाई फुले विद्यालय पवनी येथील मुख्याध्यापिका सुजाता वासनिक, प्रहार संघटना कार्यकर्ते धनराज सेलोकर, शाळेचे मुख्याध्यापक राकेश बिसने आदी मान्यवर मंडळींच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक गिरी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रयागराज भोयर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुरलीधर जिवतोडे, सुप्रिया रामटेके, धनश्री मुंडले, संगिता बिसने,विजुमाला साखरकर,करुना वाघमारे यांनी मोलाचे सहकार्य केले.