काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जनसामान्यांच्या समस्या सोडवाव्यात,,, ,,आमदार सुभाष धोटे


लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदुर शहर काँग्रेस कमिटी च्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन लोकप्रिय आमदार मा. सुभाष भाऊ धोटे यांचे हस्ते गडचांदूर येथे संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. सविताताई सुरेशराव टेकाम होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून राजुरा विधानसभा काँग्रेस चे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण भाऊ धोटे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब मोहितकर, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विठ्ठलराव थिपे , माजी सभापती नोगराज मंगरूळकर, व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष हंसराज चौधरी, माजी जीप सदस्य उत्तमराव पेचे, नगर परिषदेचे गटनेता विक्रम येरणे, माजी सरपंच शिवकुमार राठी, माजी उपसरपंच बापूराव शेरकी, नगर परिषदेचे सभापती अरविंद मेश्राम, नगरसेवक पापया पोन्नमवार , राहुल उमरे, जयश्री ताकसांडे, अर्चना वांढरे, व्यंकटेश बालसनिवार, रऊफ खान, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना गटनेता विक्रम येरणे यांनी सांगितले की बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालय चे आज उद्घाटन झालेले असून पक्षाचे सर्वच संघटनाचे कार्यकर्ते या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांच्या समस्या मार्गी लावणार आहेत. माजी पंचायत समितीचे सभापती नोगराज मंगरूळकर, ज्येष्ठ नेते बाळासाहेब मोहीतकर यांनी आपल्या भाषणात काँग्रेस पक्षाचा इतिहास आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी या बाबत मार्गदर्शन केले.
आमदार सुभाष भाऊ धोटे यांनी आपल्या भाषणात गडचांदूर हे विधानसभा क्षेत्रातील राजुरा शहराच्या बरोबरीचे शहर असून पक्षाचे कार्यालयाची नितांत आवश्यकता होती. कोरोना महामारी मुळे कार्यालय सुरू होण्यास विलंब झाला तरी आज पासून या कार्यालयाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडविण्याचे हे एक प्रमुख माध्यम राहील. पक्षाचे पदाधिकारी या कार्यालयाच्या माध्यमातून जनतेच्या सतत संपर्कात राहील. सध्याच्या राजकीय परिस्थितीत राज्याची सत्ता ही गेलेली असली तरी काँग्रेस ही सदैव जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत राहील. सत्ता नसली तरीही विकासकामे ही सुरूच ठेवण्याचा आमदार म्हणून माझा प्रयत्न सुरूच राहणार असून गडचांदुर येथील सुरू असलेली विकास कामे पुढेही सुरू ठेवण्याचा माझा प्रयत्न असाच सुरू राहील. नवीन पक्ष कार्यालयातून लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहण्याचे आदेश त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले. नगराध्यक्ष सविताताई टेकाम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आपली नगरपरिषद ची संपूर्ण टीम ही जनतेच्या सेवेकरीता सदैव उपलब्ध असल्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाच्या यशस्विते करिता माजी उपसरपंच आशिष देरकर, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष शैलेश लोखंडे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष उमेश राजूरकर, सदस्य अनिल निवलकर, सतीश बेतावार, कामगार नेते दिपक येवले,महिला काँग्रेस अध्यक्ष माधुरी ताई पिंपळकर, युका उपाध्यक्ष अतुल गोरे, युवक काँग्रेस चे अध्यक्ष रुपेश चुदरी, रोहित शिंगाडे, एन एस यु आई अध्यक्ष प्रीतम सातपुते उपस्थित होते.
प्रास्ताविक गटनेता विक्रम येरणे,यांनी केले. संचालन शहर अध्यक्ष संतोष महाडोळे यांनी केले तर आभार नगर परिषदेचे सभापती अरविंद मेश्राम यांनी मानले,याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे नेते,कार्यकर्ते उपस्थित होते
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *