आत्मविश्वास हाच यशाचा मार्ग ,,,,,ॲड. वामनराव चटप

आत्मविश्वास हाच यशाचा मार्ग
,,,,,ॲड. वामनराव चटप

लोकदर्शन👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
नांदा येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व सत्कार सोहळा संपन्न
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

गडचांदूर,,
,,,,,,,,,,,,,,,,,,,
स्पर्धेत टिकायचे असेल तर प्रयत्न आणि आत्मविश्वास अत्यंत गरजेचा असून आत्मविश्वास हाच यशाचा मार्ग असल्याचे मत माजी आमदार ऍड वामनराव चटप यांनी व्यक्त केले नांदा येथे ग्रामदुत फाउंडेशन कोरपना, तालुका प्रेस क्लब,श्री प्रभु रामचंद्र विद्यालय ,गुरुकुल महाविद्यालय, अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान द्वारा आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन माजी सभापती संजय मुसळे होते, प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती निळकंठ कोरांगे ,कामगार नेते साईनाथ बुच्चे, प्राचार्य डॉ अनिल मुसळे ,ॲड दीपक चटप ,प्रतीक बोरडे, माजी उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, डाँ चांदेकर, हबिब शेख, शाळेचे संचालक किसन गोंडे, मनोहर झाडे ,साईदास रोगे, माजी सरपंच भास्कर जोगी ,सुरेश धोटे, मुरलीधर बोडके ,प्राचार्य पोइंकर, रत्नाकर चटप, रत्नाकर बोभाटे आदी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी लंडन देशाची शिष्यवृत्ती मिळविलेल्या एड दीपक चटप व नायब तहसीलदार पदी निवड झालेले प्रतीक बोरडे यांचा सत्कार करण्यात आला .ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दीपक चटप आणि प्रतीक बोर्डे यांनी मिळवलेले यश प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी संजय मुसळे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी परिस्थितीची तमा न बाळगता जिद्द आणि चिकाटी ठेवून स्पर्धा परीक्षेत प्रयत्न करावे असे मत यावेळी दीपक चटप यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अनिल मुसळे यांनी केले,संचालन प्रेस क्लबचे पदाधिकारी प्रमोद वाघाडे यांनी केले तर आभार राम रोगे यांनी मानले कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *