लोकदर्शन 👉 मोहन भारती
====================
जिवती :- जिवती तालुक्यात ५० हजारांहून अधिक पशुधन आहे. त्यांच्यासाठी येथे सहा पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. मात्र, या दवाखान्यांत पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची बहुतांश पदे रिक्त असल्याने येथील जनावरांना व पशु-पक्ष्यांना वेळेत उपचार मिळताना दिसत नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
जिवती तालुक्यातील वणी (बु ), लांबोरी येथे श्रेणी ‘अ’ व शेणगाव, पाटण, जिवती व भारी येथे श्रेणी ‘ब’ असे सहा पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यामध्ये ८४ गावांसह वाड्या-वस्त्यांचा समावेश होतो. जिवती पंचायत समितीमध्ये पशुसंवर्धन विभागाचे कार्यालय आहे. तरी तालुक्यातील वरील प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यात अनेक पदे रिक्त आहे. पशवैद्यकीय दवाखाण्यातील अनेक पदे रिक्त असल्याने खेड्यापाड्यातील आजारी पशु-पक्ष्यांना वेळेत उपचार मिळत नाहीत. तसेच लसीकरण व विविध योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. सध्या पावसाळ्याचे दिवस असून संततधार अतिवृष्टी पाऊस असल्यामुळ परिसरातील जनावरे अधिक प्रमाणात बिमार पडून दगावत आहेत. पदे रिक असल्यामुळे शेतकरीवर्ग स्वतःआपल्या पशूंना गोळ्या, इंजेक्शन देऊन इलाज करीत आहेत. शेतकऱ्यांच्या या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे त्यात अनेक जनावरे दगावली आहेत. व पुढे दगावण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही, काही पशूंना तर उपचार न मिळाल्याने आपले प्राण गमवावे लागत आहेत. शेतकरी राजा संततधार पावसामुळे व अनेक ठिकाणी पूर आल्यामुळे आधीच चिंतातुर असून त्यात जनावरांना वेळेवर योग्य उपचार मिळत नाही, काही उपलब्ध कर्मचारी कामानिमित्त फिरतीवर असतात. त्यामुळे उपचारासाठी दवाखान्यात पशू व जनावर घेऊन येणाऱ्या लोकांना उपचाराविना मागे फिरावे लागत आहे. त्यांना होणाऱ्या समस्याची दखल घेऊन तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यातील सर्व रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी महेश देवकते माजी पं. स. उपसभापती यांनी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांना दिलेल्या निवेतनातून केली आहे.