लोलदर्शन👉 विठ्ठल ममताबादे
उरण दि 21 जुलै उरण तालुक्यातील जेएनपीटी अर्थातच जे एन पी ए बंदरात जवळपास 950 कामगार विविध सोसायट्या मध्ये कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स म्हणून काम करीत आहेत.त्यांच्या वेतन कराराचा कालावधी संपून 27 महिने झाले तरी जेएनपीए प्रशासन नवीन करारावर सह्या करण्यास टाळाटाळ करीत आहे. याच्या निषेधार्थ जेएनपीटी जनरल कामगार संघटनेच्या वतीने एक दिवसीय संपाची नोटीस जेनपीए प्रशासनाचे चीफ मॅनेजर (सेक्रेटरी ) जयंत ढवळे यांना युनियनचे अध्यक्ष सुरेश पाटील व कार्याध्यक्ष सुधीर घरत, जनरल सेक्रेटरी जनार्दन बंडा यांनी दिली.
जेनपीए मध्ये कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स हे स्थानिक प्रकल्पग्रस्त असून विविध सोसायट्या मध्ये कार्यरत आहेत. जुना करार 31मार्च 2020 रोजी संपुष्टात आला .27 महिन्यांचा कालावधी होऊन सुद्धा विशेषतः जेएनपीए चे चेअरमन यांच्या समवेत झालेल्या चर्चेत युनियनचे सल्लागार आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत पगार वाढ व इतर सर्व विषयावर चर्चा पूर्ण होऊन सुद्धा करारावर सह्या करण्यास प्रशासनाचे अधिकारी टाळाटाळ करीत आहेत.
अंतिम चर्चा होऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन सुद्धा प्रशासनातील झारीतील शुक्राचार्य वेळ काढू पणा करीत आहेत. याच्या निषेधार्थ जेएनपीटी जनरल कामगार संघटनेच्या वतीने दिनांक 29 /7 /2022 रोजी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्याची नोटीस प्रशासनाला दिली आहे. यावेळी संघटनेचे जनरल सेक्रेटरी जनार्दन बंडा , मिन्नाथ भोईर, हरेश मढवी व इतर कामगार उपस्थित होते.