लोकदर्शन👉 मोहन भारती
राजुरा 21जुलै :– राजुरा मतदार
संघातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यात गेली 10 ते 12 दिवसापासून सतत मुसळधार पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील नदी, नाले मोठ्या प्रमाणात वाहत असल्यामुळे शेतातील उभी पिके जमिनीत गाळल्या गेली आहेत, तसेच अति पाऊसामुळे शेती खरवळुन गेल्यामुळे नुकतीच काही दिवसापुर्वी पेरणी झालेली पिके वाहुन गेली असुन शेती करण्यायोग्य राहलेली नाही. पूरग्रस्त भागातील शेतकन्यांवर दुबार पेरणीची वेळ उद्भवलेली आहे. तसेच काही भागात पूर परिस्थितीने शेतात पाणी साचून असल्याने शेतातील पिके खराब झालेली आहेत. ग्रामिण भागात नदी, नाले ओसंडुन वाहत असल्यामूळे अनेकांच्या घरात पुराचे पाणी गेले असुन जिवनावश्यक वस्तु पाण्यात बुडाल्याने व शेतीविषयक अवजारे व खते वाहुन गेल आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबियांवर उपासमारीची वेळ उद्भवलेली आहे.
करीता राजुरा मतदार संघातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यामधील अतिवृष्टी व पुरपरीस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रु. प्रमाणे नुकसान भरपाई देणेसंदर्भाने तातडीची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.