लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,
अमलनाला धरणाजवळ असलेल्या नौकारी (बु) येथील स्व.संजय राजाराम कंडलेवार वय 50 वर्ष हा व्यक्ती दिनांक 10जुलै ला सकाळी 9 वाजता नोकारी बु.(माईंनस) ता.राजुरा येथील नाल्याच्या प्रवाहात वाहून गेला होता व शोध घेतला असता 13 जुलै ला मृतदेह अमलणाला धरण येथे तरंगताना आढळून आला होता
मयताच्या परिवाराला शासनाच्या वतीने आर्थिक साहाय्यताचा 4 लक्ष रुपयांचा धनादेश मा.हरीश गाडे ,तहसीलदार राजुरा यांनी नोकारी बु.(गोवारीगुडा) येथे 19 जुलै ला मयत संजय/संजीत यांचे परिवाराची भेट घेऊन देण्यात आला. यावेळी श्री.साळवे,मंडळ अधिकारी, श्री. वडस्कर , तलाठी ईसापुर, वामन तुरानकर माजी उपसरपंच नोकारी बु राकेश भगत पो.पाटील नोकारी बु.रमेश
नैताम कोतवाल ईसापुर हे उपस्थित होते. मयताचा परिवार दुखात असताना मा.तहसीलदार साहेब यानी व महसुल विभागाचे कर्मचारी ,पोलीस स्टेशन गडचांदूर, पो.स्टेशन चंद्रपूर शोध पथक,पत्रकार प्रा अशोक डोईफोडे, ग्रामस्थ यानी केलेले सहकार्य अमूल्य आहे व वामन तुरानकर माजी उपसरपंच यानी केलेला पाठपुरावा व मदत यामुळे सर्व शक्य झाले असे सांगण्यात आले.मयत च्या परिवाराने शासनाचे व ग्रामस्थांचे आभार मानले.