लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे
उरण दि १८
आमदार महेशशेठ बालदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक १७/०७/२०२२ रोजी पर्यावरण , कला आणि सामाजिक भान जोपासणाऱ्या “मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण” या संस्थे तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवून आमदार महेश बालदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण या सामाजिक संस्थेने केला आहे.
सकाळी – १०.०० वाजता झाडे लावण्यात आली.त्यानंतर सकाळी- ११.०० वाजता चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेत एकूण ९७ विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. दुपारी – २:०० वाजता चारफाटा, उरण येथे झोपडपट्टी येथील गरजू मुलांना अन्नदान करण्यात आले .
सायंकाळी – ४.०० वाजता
ठाकूर नगर ONGC झोपडपट्टी मधील गरजू मुलांना,विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्याचे वाटप करण्यात आले.
या वेळी चित्रकला स्पर्धेचे उदघाटन माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक रवीशेठ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रमाला गौरी देशपांडे (सचिव महाराष्ट्र प्रदेश कलाकार समन्वय विभाग, भाजपा चित्रपट युनियन), गौरी मंत्री (सदस्य, भाजपा सांस्कृतिक सेल, उरण),श्लोक पाटील (पर्सनैलिटी डेवलपमेंट स्कूल, उरण), महिला सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती भोईर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल विजय पाटेकर यांनी सर्वांचे आभार मानत असेच सामाजिक कार्य आमदार महेश शेठ यांच्या मार्फत करत राहू असे आश्वासन दिले . या कार्यक्रमाला उपस्थित मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे सभासद विकास पाटेकर , शौनक समेळ , भावेश रावल , भद्रेश रावल , बादल म्हात्रे , गिरीश पाटेकर, पुनम पाटेकर, सायली पाटेकर यांनी अमूल्य मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केले.