लोकदर्शन 👉 मारोती चापले
*
*गडचांदूर-*
दिवसेंदिवस वाढत चालली स्पर्धा,प्रचंड बेरोजगारी व परीक्षांचे बदलते स्वरूप याअनुषंगाने युगचेतना ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूर च्यावतीने एकदिवशीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन २२जुलैला बालाजी सेलिब्रेशन हाॕल गडचांदूर या येथे करण्यात आले आहे
. सदर कार्यशाळेत नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत नायब तहसीलदारपदी नियुक्ती झालेल्या श्री मा. प्रतीकजी बोरडे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी व्यवस्थापन मंडळाचे मा.नामदेवराव ठेंगणे ,प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक मा.सत्यजीत आमले,मा.अरूणजी निमजे,मा.प़कजजी पवार,मा.शरदभाऊ जोगी,मा.बालाजीभाऊ पुरी,मा.रमेश राठोड,मा.सःतोष पाल उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
दिनांक 22 जुलै रोज शुक्रवारला सकाळी ११ वाजेपासून आयोजित कार्यशाळेस कोरपणा व जिवती तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.असे आवहन प्राचार्य,प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडाचांदूर यांनी केले आहे.