लोकदर्शन 👉 मोहन भारती
आमदार सुभाष धोटे यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी.
राजुरा (ता.प्र) :– राज्यात गेली 5 ते 6 दिवसापासुन सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. चंद्रपुर जिल्हात अनेक ठिकाणी ढग फुटी झाली. पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे शेतातील उभी पिके जमिनीत गाळल्या गेली आहेत. अति पाऊसामुळे शेती खरवळून गेली असुन शेती करण्यायोग्य राहलेली नाही. नुकतीच काही दिवसापूर्वी पेरणी झाल्याने पूरग्रस्त भागातील शेतकन्यावर दुबार पेरणीची वेळ उद्भवलेली आहे. चंद्रपुर जिल्हातील ग्रामिण भागात नाले ओसंडुन वाहत असल्यामूळे अनेकांच्या घरात पुराचे पाणी गेले असुन जिवनावश्यक वस्तु पाण्यात बुडाल्याने अनेक कुटुबियांवर उपासमारीची वेळ उद्भवलेली आहे. अतिवृष्टीमुळे अनेकांची कच्ची घरे पडल्याने त्यांना निवासाची समस्या निर्माण झाली आहे.
राजुरा मतदार संघतील तालुक्यामध्ये राजुरा 488.01 मी.मी. कोरपना 656.08 मी.मी, गोंडपिपरी 545.09 मी.मी जिवती 885.06 मी.मी पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन फारमोठे नुकसान झाले आहे. करीता राजुरा मतदार संघातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यामधील अतिवृष्टी व पुरपरीस्थितीमुळे नुकसान झालेल्या परिसराचे सर्वेक्षण करून संबंधित नुकसानग्रस्त शेतकन्यांना व इतर नागरीकांना सरसकट नुकसान भरपाई मिळणेसंदर्भाने तातडीची योग्य कार्यवाही करून मदत करावी अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.