लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
शिक्षण हे देशाच्या विकासासाठी मूलभूत पाया आहे. हे लक्षात घेऊन जिल्हा परिषद शाळेतील मुलांची संख्या वाढावी त्यांना शाळेची गोडी लागावी हे लक्षात घेऊन अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर ने नजीकच्या एकूण १२ गावातील १३ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एकूण ५६५ विद्यार्थ्यांना एकूण ३२१८ नोटबुकचे वितरण करण्यात आले. या नोटबुक मध्ये सिंगल लाईन, डब्बल लाईन, थ्री लाईन, स्क्वेअर व ड्राइंग बुक चा समावेश होता.
यामध्ये आवारपुर, बिबी, नांदा, राजुरगुडा, कोल्हापूरगुडा, पालगाव, नोकारी, तळोधी, बाखर्डी, भोयगाव, हिरापूर व सांगोळा या १२ गावांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा समावेश होता. विशेष म्हणजे मराठी शाळेसोबत एका तेलगू शाळेला सुद्धा नोट बुक प्रदान करण्यात आले.
या नोटबुक वरती सी.एस.आर. चे गावात केलेल्या विकास कामांचे चित्र प्रदर्शीत करण्यात आले. नोटबुकचे उद्घाटन अल्ट्राटेक चे युनिट हेड, श्रीराम पी.एस. यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष, गौतम शर्मा, संदीप देशमुख, सौदीप घोष तसेच महाव्यवस्थापक, कर्नल दीपक डे, सी.एस.आर., प्रमुख सतीश मिश्रा, सचिन गोवारदीपे, डॉक्टर गोदावरी नवलानी, संजय ठाकरे व देविदास मांदाळे यांची उपस्थिती होती.