नौकारी येथील नाल्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या संजय चा शोध अद्याप लागला नाही

लोलदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
अमलनाला धरणाजवळ असलेल्या नौकारी येथील संजय राजाराम कंडलेवार वय 50 वर्ष हा व्यक्ती दिनांक 10।7।2022 रोजी सकाळी 9 वाजता नोकारी बु.(माईंस) ता.राजुरा येथील नाल्याच्या प्रवाहात वाहून गेला व नाल्याच्या दोन्ही बाजुने अमलनाला धरणा पर्यंत व धरणात शोध घेतला असता कुठेच आढळून आला नाही व शोध घेण्यासाठी दि.11/07/2022 ला नोकारी बु. व अमलणाला धरण येथे चंद्रपूर येथील पोलीस विभागाचे शोध पथक दाखल झाले व शोध घेतला असता त्याना सुध्दा या शोधकार्यात यश आले नाहि व पावसाचे व पुराचे वाढते प्रमाण पाहता शोध घेण्यात अडथळा निर्माण होत आहे . परिवारातील बहीण भाऊ जावई व ग्रामस्थ मित्र शोध घेत आहे. परिसरात कुठेही आढळून आल्यास पोलीस स्टेशन गडचांदूर व त्यांच्या नातेवाईकास संपर्क करावा
आणी पाण्याचा प्रवाह धोकादायक पातळीवर आहे असे असताना नाला नदी,रस्ता ओलांडू नये व पाण्यात ऊतरुन सेल्फी,फोटो काढण्याचा प्रयत्न व मजा मस्ती करु नये जीवन आपल्यासाठी व परिवारासाठी अमूल्य आहे असे आवाहन करण्यात आले आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *