उरण : (विठ्ठल ममताबादे )आषाढी एकादशीचे औचित्य साधून जनसेवेतून आनंद देणा-या वशेणीत इतिहास संपादकीय मंडळाकडून नुकताच श्री/सौ आनंदी अर्जुन ठाकूर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ गरिब गरजू मुलींना देण्यात आला.
वशेणी हे गाव शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाते. अशा पंढरीत शाळकरी मुलांना शिक्षणासाठी मदत
मिळावी म्हणून वशेणी इतिहास संपादकीय मंडळ विविध उपक्रम राबवते. याच मंडळाचे कार्यरत सदस्य आदिनाथ पाटील यांच्या सौजन्याने श्री/सौ.आनंदी अर्जुन ठाकूर ही शिष्यवृत्ती योजना सुरू केली असून या वर्षी कोविड काळात ज्यांचे आई किंवा वडिल निधन पावले आहेत अशा गरजू मुलींना रोख रक्कम 1000/-रू.प्रमाणपत्र देण्यात आले.
या वर्षी कुमारी उन्मेषा मनोज ठाकूर इयत्ता 11वी,श्रेया सुहास पाटील इयत्ता 10वी, प्रणाली परशुराम पाटील 11वी, सारिका चंद्रकांत पाटील 11वी या मुलींना
शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला.
या वेळी रायगड भूषण प्रा.एल बी पाटील, इंडिया झिंदाबाद फ्रेण्डस गृप रायगड चे अध्यक्ष रमेश थवई, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी रमेश पाटील, सेवानिवृत्त प्राचार्य श्रीकांत पाटील, बळीराम म्हात्रे, रवि पाटील,अल्पेश खेरटकर, बी.जे.म्हात्रे, अनंत तांडेल, विजय पाटील, नरेश पाटील, सतिश पाटील, विश्वास पाटील, अनंता ठाकूर,तनुजा पाटील,आनंदी ठाकूर,अर्जुन ठाकूर,वामन म्हात्रे, राहुल थवई, संजय पाटील,रमेश सर आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्र संचालन वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे कार्यवाहक मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी केले.