(विठ्ठल ममताबादे )
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राजसाहेब ठाकरे यांचे दिनांक ५ जुलै ते ११ जुलै दरम्यान कोकणातील महासंपर्क दौरा सुरु आहे. या दौऱ्या दरम्यान युवा नेते अमित ठाकरे मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. तसेच त्या त्या भागातील नागरी समस्या जाणून घेणार आहेत. मनसे पक्षाचा प्रसार व प्रचार करण्याच्या दृष्टीने व पक्ष तळागाळात पोहोचविण्याच्या दृष्टीने सदर दौऱ्याचे आयोजन केले असून या दौऱ्याचा एक भाग म्हणून उत्तर रायगड मधील सोमवार दिनांक ११ जुलै २०२२ रोजीचे युवा नेते अमित ठाकरे उरण व पनवेल तालुक्यात येणार आहेत. तेंव्हा मनसेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी, मनसैनिकांनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी केले आहे.
अमित ठाकरे यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे.
कर्जत वरून उरण कडे १ वाजता येणार
◆ उरण एज्युकेशन सोसायटीच्या
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी चर्चा.१:०० वाजता
◆ मनसे उरण कार्यालयास भेट १:३०वाजता
◆ हॉटेल पिंच ऑफ पाईस येथे जेवण.२:३० ते ३:३० वाजता
पनवेल येथे ४ वाजता आगमन
◆ १००वर्ष जुन्या लिमये
वाचनालयास भेट ४:०० वाजता
◆ लोकनेते दि.बा. पाटील
यांच्या निवासस्थानी भेट.४:३० वाजता
◆ महिला कार्यालय जिजाऊ गडास भेट ४:४५ वाजता
◆ जेष्ठ नागरिक सभागृहात
मनसे विद्यार्थी सेना बैठक
व मनसे पदाधिकारी चर्चा.५:०० वाजता
◆ कामोठे येथे पक्ष प्रवेश.सायंकाळी ७:०० वाजता
◆ मुंबई येथे प्रयाण.रात्री ८:०० वाजता