लोकदर्शन प्रतिनिधी:👉- स्नेहा उत्तम मडावी पुणे
आजपर्यंत महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषविणारे,राज्याला सुजलाम सुफलाम करून राज्यात हरितक्रांती आणणारे बहुआयामी व्यक्तीमत्व तथा हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांची 109 जयंती आणि ॲड. रमेश खेमू राठोड यांना कन्यारत्न प्राप्त झाल्यामुळे खालीलप्रमाणे 9 (नऊ) कलमी सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आले.
1)1009 साडी वाटप
2)1009 पुस्तक वाटप
3)1009 वृक्ष वाटप
4)1009 धान्य वाटप
5)10009 रू.कुसुमवत्सल्य फाउंडेशनला आर्थिक मदत
6)10009 रू.हंस फाऊंडेशनला आर्थिक मदत
7)5009 रू.कै.ॲड.हरिष दासा यांच्या कुटूंबियाला आर्थिक मदत
8)509 किलो फुलांनी मा.वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्याची सजावट
9)जयंती दिवशी आलेल्या बंधू भगिनींना अल्पोपहार व फराळाचे वाटप
सदर उपक्रमास माजी तथा आमदार हरिभाऊ राठोड,निवृत्त न्यायाधीश प्रकाश राठोड,विठ्ठल राठोड,अविनाश सकुंडे,सुनील राठोड,सौ पुनम राठोड,बंटी चव्हाण,जगदीश राठोड,सागर जाधव,युवराज आडे,चंद्रनील राठोड,विशाल राठोड, रामू पवार,सुलतान शेख,विपुल राठोड,कोमल पवार,ॲड.रोहिणी देशमुख,ॲड.सुजाता गायकवाड,ॲड.अजय बागमोडे,ॲड.सपना नलेगांवकर,सोहेल शेख,राजु राठोड,सारिका राठोड,फरजाना शेख,कुमार रत्नंजय राठोड आणि कुमारी रत्नंशा राठोड इत्यादी असंख्य बांधव उपस्थित होते.सदर वेळी गरजु भगिनींना साडीचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे अन्नधान्य,वृक्ष,पुस्तक आणि खाऊचे देखील वाटप करण्यात आले.अशा प्रकारे वसंतराव नाईक साहेबांची 109 वी जयंती आणि बंजारा समाजाचे दानशूर व्यक्तीमत्व कायदेत्ज्ञ ॲड. रमेश राठोड यांना कन्यारत्न प्राप्त झाल्यामुळे 9 (नऊ) कलमी सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आले.सदरचे उपक्रमाचे आयोजक व संयोजक ॲड. रमेश खेमू राठोड यांनी केले आहे…!