लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
अर्थ फाउंडेशनच्या मिशन ग्रीन अर्थ अभियान अंतर्गत गडचांदूर शहराच्या परिसरात पर्यावरणाला प्रदूषण मुक्त करण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे या अंतर्गत गडचांदूर शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे याप्रसंगी गडचांदूर येथील ऐतिहासिक बुद्धभूमी परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली व त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली याप्रसंगी नागपूर येथील पुरातत्त्व विभागाच्या वसुंधरा भोयर , मयुरी देवधर ,समृद्धी गिरी, निखिल रोड्रिगो (पुरातत्त्व आर्किटेक्चर )या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली . याप्रसंगी अर्थ फाउंडेशन चे संचालक डॉ. कुलभूषण मोरे , बुद्धभूमी कमिटीचे सदस्य गौतम भसारकर, चंद्रमणी उमरे ,दशरथ डांगे, भानुदास पाटील, किशोर डोंगरे, पंडित डोंगरे ,रामदास जीवने, रवी वाघमारे, तुकाराम नगराळे, एकनाथ पाटील, आणि सदस्य उपस्थित होते .अर्थ फाउंडेशनच्या मिशन ग्रीन अभियाना अंतर्गत विविध संघटनांच्या साहाय्याने गडचांदूर शहरात तसेच तालुक्यात वृक्षारोपण करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन अर्थ फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
,