लोकदर्शन 👉नितेश केराम कोरपना प्रतिनिधी)
चंद्रपूर राजुरा /राजुरा तालुक्यातील मौजा भागूलवाई कोष्ठाळा येते कृषी विभाग राजुरा आत्मा अंतर्गत पोषणयुक्त सुरक्षित अन्न सुरक्षा योजनेत जगूदेवी महिला बचत गटाअंतर्गत शेतकरी कुटुंबाला विविध भाजीपाला कडधान्य बियाणे मिनीकिट चे वितरण करण्यात आले
या प्रसंगी आत्माचे अध्येक्ष तिरुपती इंदूरवार यांनी सदर कार्यक्रमाचे उद्धेश समजावून सांगितले .येणाऱ्या उत्पादणातून पोषणमुल्याची गरज भागवने शक्य होईल ,विशामुक्त सुरक्षित अन्न शेतकरी कुटुंबाला मिळू शकेल तसेच तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय योजनाची माहिती पोहाचवून त्याना सुरक्षित अन्न घटक मिळेल त्यामुळे असे उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोचविण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. या प्रसंगी तालुका शेतकरी सलागार समितीचे अध्यक्ष तिरुपती मलाया इंद्रूरवार तालुका कृषी अधिकारी सी के चव्हाण मंडळ कृषी अधिकारी व्ही .के
अकपल ,कृषी पर्यंवेक्षक आर आर गादंनगीवार तालुका तंत्रण्यान व्यवस्थापक के व्ही चंदनबटवे शेतकरी मित्र नामदेव रोहने तसेच उमेदच्या शिला जाधव व समस्त भागूलवाई येतील महिला शेतकरी ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते.