लोकदर्शन👉शहादा
दि.०७ वार गुरुवार रोजी गणोर येथे महेंद्र निकुंभ यांचे वडील स्व.देवसिंग वळवी यांच्या पुण्यतिथी निमित्त हेल्थ चेकअपचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शहादा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राजेश पाडवी यांच्यासह नागरीक मोठ्या सांख्येने उपस्थित होते.यावेळी ७१ व्यक्तींनी या शिबीराचा लाभ घेतला.
यावेळी आलेल्या सर्वांचे हेल्थ चेकअप जागतिक आरोग्य सल्लागार संतोष भगवानराव शिंदे नंदुरबार,तसेच जी.डब्ल्यु.सी, दुर्गा मराठे मॅडम व सुनिल शेळके सर यांच्या मार्गदर्शनाखाली ७१ व्यक्तींचे हेल्थ चेकअप करण्यात आले.व त्यांच्या सोबत निरोगी आरोग्य बाबत सकारात्मक चर्चा करुन मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे आयोजन महेंद्र निकुंभ सर व मॅडम तसेच त्यांचे सहकारी यांच्या वतीने करण्यात आले होते.संतोष शिंदे व त्यांची टिम संपुर्ण महाराष्ट्रासह नंदुरबार जिल्ह्यामध्ये काम करत आसुन लोंकाना हॕप्पी आणी हेल्दी कसे राहायचे यासाठी ते सतत प्रयत्न करत आहेत.याकामी त्यांना वरीष्ट जागतिक आरोग्य सल्लागार डाॕ.तुकाराम नेहरकर सर,डाॕ.परमेश्वर बटुळे सर ,नीतिन बारगजे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.यावेळी या शिबीरामध्ये आलेल्या व्यक्तींना मोफत बाॕडी चेकअप व मार्गदर्शन लाभल्याने जागतिक आरोग्य साल्लागार संतोष शिंदे,दुर्गा मराठे,सुनिल शेळके या सर्वांचे निंकुभ सर व सर्वानी आभार मानले.