लोकदर्शन प्रतिनिधी 👉:-स्नेहा उत्तम मडावी
सिद्धार्थ तरुण मंडळ व विहार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर गाव येथील आल्हाट वस्ती येथे पहिले आरक्षण देणारे पहिले राजे श्री छत्रपती शाहू राजे यांच्या जयंती निमित्त अभिवादन करून 10वी व 12वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 10 वी व 12 वी उत्तीर्ण झालेल्या विदयार्थ्यांना स्मितसेवा फौंडेशन च्या संस्थपिका अध्यक्षा सौ स्मिताताई तुषार गायकवाड मार्फत वह्या वाटप करण्यात आले.
यावेळी छत्रपती शाहू महाराजांचे विचार, त्यांची काम करण्याची पद्धत, शिक्षण प्रसार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जडणघडण मध्ये मोलाचे सहकार्य देणारे छत्रपती शाहू महाराज यांनी डॉक्टर बाबाबासाहेब आंबेडकर यांना वेळोवेळी केलेली मदत अशा या विविध विषयांवर स्मिताताई गायकवाड यांनी भाष्य केले तसेच मुलांनी कसलाही न्यूनगंड न बाळगता जिद्द, चिकाटी, इच्छाशक्ती, विश्वास, प्रामाणिकता याची कास धरली असता कुठलीही गोष्ट अशक्य नाही असे सांगितले व मुलांना वह्या वाटून प्रोत्साहन देऊन कौतुकाची थाप दिली.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा हडपसर गाव अध्यक्ष सुनील तात्याआल्हाट, विहार समिती अध्यक्ष सचिन बापू आल्हाट, सिद्धार्थ तरुण मंडळ अध्यक्ष विवेक आल्हाट, रिपब्लिक एम्प्लॉयी फेडरेशन चे सरचिटणीस राम सर्वगोड, उपाध्यक्ष संदेश दादा आल्हाट, माता रमाई महिला संघाचे अध्यक्ष स्वातीताई आल्हाट, उपाध्यक्ष गौरी आल्हाट, सिद्धार्थ तरुण मंडळ सचिव सुहास भाऊ आल्हाट यांनी वरील कार्यक्रम नियोजन व सहकार्य लाभले. यावेळी स्मितसेवा सदस्य सुनीता ताई रायकर, शीतल ओव्हाळ, आरती कांबळे, भावना कांबळे, छाया भिसे, आरती रणसिंग, माधवी पुजारी उपस्थित होत्या.