लोकदर्शनप्रतिनिधी -👉 स्नेहा उत्तम मडावी मुंबई,
मुंबईच्या नरिमन पॉइंट ह्या ठिकाणी आमची ,अभिनेता मारुती कटके सरांशी भेट झाली व आम्ही तेथेच सरांची मुलाखत घेतली –
मी अभिनेता कसा झालो मझ मलाच कळलं नाही मी लहान होतो साधारणतः वयाच्या आठव्या वर्षी माझे वडील मला आमच्या गावी घेऊन गेले होते त्या वेळी माझ्या वडिलांनी मला चित्रपट बघायला चित्रपट गृहात घेऊन गेले होते तेंव्हा “कच्चे धागे” हा चित्रपट प्रदर्शित झालेला होता माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा चित्रपटगृहात चित्रपट पाहिला होता, चित्रपट बघून मी खूप आनंदी झालो मला अजय देवगण सारंच काम आवडल होत, त्या नंतर मी अजय देवगण, अक्षय कुमार सरांचे चित्रपट बघ्याला खूप आवडतं गेले त्यानंतर मी जेंव्हा कॉलेज मध्ये गेलो (राम निरंजन झुनझुनवाला कॉलेज) हे कॉलेज घाटकोपर (प) मध्ये आहे, तर माझे बरेच मित्र होते खास मित्र दोन होते गुरुनाथ पाटील आणि तेजस साकोरे आम्ही खूप मस्ती मझाक करत असायचो अभ्यासात जास्त लक्ष्य नसायचं पण आम्ही पास व्ह्याचो एके दिवशी आमच्या क्लास मध्ये मराठी विषयाचा लेक्चर होता मॅडम ला बघून आम्ही मस्ती करत होतो माच्या काही मैत्रिणी होत्या त्यांना चिडवत असायचो ते बघून मॅडम ने आम्हाला बोलले लेक्चर संपल्यावर तुम्ही माझ्या सोबत सेमिनार हॉल मध्ये यायचं तस म्यांच बोलण एकूण आम्हाला वाटलं आता मॅम प्रिन्सिपल मॅम कडे घेऊन जाऊन आम्हाला शिक्षा करणार तस आम्ही तिघे शांत झालो, लेक्चर सुटल्यावर मॅम्म ला आम्ही सॉरी बोलून आम्ही माफी मागितली पण म्यामम ने आमचं काही एकल नाही शेवटी आम्हाला ते सेमिनार हॉल मध्ये घेऊन गेले, तिथे एका एकांकिकेची रिहर्सल चालू होती दिग्दर्शक प्रमोदजी होते त्यांना मॅम ने आमच्या बद्दल सांगितल की ह्या तिघांचं लक्ष्य काही अभ्यासात लागत नाही ह्यांना तुझ्या नाटकात घे इथे तरी त्यांचं लक्ष्य लागेल असं म्हणून मॅम ने आम्हाला त्या दिग्दर्शकाच्या स्वाधीन केलं मझ मन नाटकात रमाय लागलं मला त्या एकांकिका मध्ये छोटीशी भूमिका भेटली आमची एकांकिका स्पर्धेत नाही आली पण मझ मन समाधान झाल होत त्या नंतर मी नाटक, पथनाट्य, एकांकिका, मालिका ह्यात भूमिका करत राहिलो व मी चित्रपटासाठी ऑडिशन देत राहायचो एक वेळी मी ठाणे मध्ये सोलापूर गँगवार ह्या चित्रपटासाठी ऑडिशन दिलं आणि त्या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रभू राठोड सरांनी मझ निगेटिव्ह रोलसाठी सीलेक्शन केलं आणि त्यांनी त्या रोल साठी माझ्या कडून मेहनत करून घेतली आणि मला सयाजी शिंदे सरांचा शूल हा हिंदी बघायला सांगितले त्यात सयाजी सरांची भूमिका बघायला सांगितले आणि सरांनी सांगितल्या प्रमाणे मी केलं शूटच्या वेळी मी पहिल्या दिवशी माझ्या पहिल्या चित्रपटच शूटिंग आहे म्हणून मी आनंदी तर होतो पण मनात थोडी भीती पण होती ती भीती प्रभू सरांनी घालवली आणि सरांच्या मार्गदर्शनानुसार मी काम केलं त्या बद्दल मी प्रभू सरांचा खूप आभारी आहे आणि माझ्या रोल्ला प्रेक्षकाची खूप दाद, प्रेम मिळालं त्या बद्दल मी माझ्या प्रेक्षकांचा खूप आभारी आहे आणि आता माझा एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला इसक हा माझा मराठी चित्रपट येत आहे ह्या चित्रपटात माझ्यासोबत नितीन बोढारे, नितीन साळवी आणि दिग्गज अभिनेते अरुण नलावडे सर आम्ही रुपेरी पडद्यावर झळकणार आहे आणि त्याच बरोबर माझे काही नवीन प्रोजेक्टचे शूट चालू आहेत आणि दाक्षिणात्य चित्रपटात सुद्धा मला काम करायची इच्छा आहे आणि बॉलीहूड मध्ये सुद्धा त्याची बातमी लवकरच माझ्या प्रेक्षकांना मिळेल…