लोकदर्शन 👉 *गडचांदूर प्रतिनिधी(प्रा
डोईफोडे)
*गडचांदूर –
मावितरण कंपनी कडून लावण्यात आलेली वीजमीटर फाल्टी ठरत असून देखील त्याआधारे अव्वाच्या सव्वा वीजबिल आकारणी करून वीजवितरण कंपनी ग्राहकाची लूट करीत आहे .तर तक्रार करणाऱ्या ग्राहकाला महावितरणच्या अधिकारी – कर्मचाऱ्या कडून वीजग्राहकांना असभ्ययवागणूक मिळत आहे .आशा मनमानी कारभाराने गडचांदूर उपविभागातील विजग्राहक बेजार झाले असून ,महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल गरजेचे आहे .
*वीजमीटर बंद असताना जादा बिल आकारणी* *कशी ?*
महावितरण कंपनीने लावलेले वीजमीटर बंद झाले असताना कंपनी कडून दिल्या जाणारे सामायिक वीजबिल वापरा पेक्षाही जास्त दिल्या जाते .तरी काही महिन्यांनी पुन्हा त्यातही वाढ करून ग्राहकांना दिले जाते . वीजमीटर बंद असताना बदलून विजग्राहकांना योग्य बिल देणे ही महावितरणची जवाबदारी असताना , गडचांदूर क्षेत्राचे अभियंता- फिल्ड ऑफिसर राऊत हे तक्रार घेऊन येणाऱ्या विजग्राहकांना,कंपनी कडे मिटर नाहीत ,तुम्ही मिटर आणून लावून घ्या !नाही तर जेवढे येईल तेवढे वीजबिल भरा ! आशा उर्मट भाषेत उत्तरे देऊन ,ग्राहककाशी वाद घालीत असभ्य प्रकारे वागणूक देतात . यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत . वीजमीटर ही जवाबदारी ग्राहकांची की वीजवितरण कंपनीची ?
*
*कार्यालयाच्या आवारात फाल्टी वीजमीटरचा खच*
गडचांदूर उपविभागीय कार्यालयासमोरच फाल्टी वीजमीटरचा खच पडलेला असताना अधिकारी ग्राहकांना बाजारातून वीजमीटर आणून लावण्यात सांगतात ,ते वीजमीटर योग्य प्रकारे प्रमाणित असतात .याची शास्वती काय ? पुन्हा तपासणी आणी पुन्हा भुर्दंड मात्र वीजग्राहकांनाच का ? असा प्रश्न आता वीजग्राहक करीत आहेत .