लोलदर्शन👉 शिवाजी सेलोकर
*पडोलीच्या सर्वांगीण विकासासाठी लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजप कटिबद्ध! – जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे*
पडोली ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच विक्की लाडसे यांनी काल झालेल्या पोटनिवडणूकीच्या बिनविरोध विजयानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची घुग्घुस येथील जनसंपर्क कार्यालयात आज भेट घेतली.
पडोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच स्व. भारत बल्की यांचे निधन झाल्याने सरपंच पद रिक्त झाले. त्यामुळे काल सरपंच पदाकरीता निवडणूक घेण्यात आली. यामध्ये विक्की लाडसे यांची एकमताने सरपंच म्हणून निवड करण्यात आली. या विजयासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले यांनी कष्ट घेतले होते. त्यामुळे निवडून आल्यानंतर आज सकाळीच नवनिर्वाचित सरपंच विक्की लाडसे यांनी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष भोंगळे यांनी सरपंच विक्की लाडसे यांना पेडा भरवुन त्यांचे अभिनंदन केले. यासोबतच तुमच्यासारख्या युवा नेतृत्वाच्या माध्यमातून पडोली, जुनी पडोली व यशवंतनगर भागाचा विकास व्हावा तसेच तुमच्या हातून जनतेची अविरत सेवा व्हावी अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. स्थानिक जनतेच्या सेवेसह पडोली ग्रामपंचायतीच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू असेही जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी यावेळी सांगितले.
भेटीदरम्यान, अनेक विकासात्मक बाबींवर जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे आणि सरपंच विक्की लाडसेंसह उपस्थितांमध्ये बराचवेळ चर्चा पार पडली.
याप्रसंगी, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, राजेश मोरपाका, पडोली ग्रामपंचायत सदस्य निशिकांत पिसे, विशाल बुरडकर, आशिष डोडलावार, इरफान पठाण, रोहन देठे, घुग्घुस भाजपचे सिनू इसारप, गणेश पिपंळकर, राजू डाकूर, धनराज पारखी, शाहीद शेख, मयूर तुराणकर, रोशन कडपते, राकेश झाडे, गणेश खुटेमाटे, नंदकिशोर खामणकर प्रामुख्याने उपस्थित होते.