सुफल आहारचा वर्धापन दिन उत्साहात साजरा


लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 1 जुलै कोरोना काळात -अनेक लोकांचे रोजगार गेल्याने बहुसंख्य कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती.अनेकांना पाणी, अन्न जेवण यासारख्या प्राथमिक मूलभूत सुविधा न मिळाल्याने अनेक गोरगरीब कुटुंबियांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे लहान मुले,बालकांचे मोठे हाल झाले होते. अशा बालकांना, लहान मुलांना कोरोना काळात व आताही खूप मोठा आधार दिला तो सामाजिक बांधिलकी जपत अन्नदान करणाऱ्या सुफल आहार या संस्थेने.

उरण तालुक्यातील चारफाटा येथे झोपडपट्टी आहे. गोरगरिब लोक येथे मोठ्या प्रमाणात राहत आहेत.मोलमजूरी काबाडकष्ट करून येथील लोक उदरनिर्वाह करतात. कोरोना काळात या लोकावर आलेले संकट पाहून वुमेन ऑफ विसडम या संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष सारिका पाटील यांनी पुढाकार घेत चारफाटा येथील झोपडपट्टीतील मुलांना एक वेळचे दुपारचे मोफत सकस आहार (जेवण )दयायला सुरवात केली. झोपडपट्टीतील लहान बालकांना कोरोना काळात मायेची उब दिली. कोरोना काळा पासून सुरु अस‌लेले हे अन्नदानाचे कार्य अविरतपणे आजही सुरु आहे.त्या सामाजिक उपक्रमाचा दिनांक 1 जूलै 2022 रोजी प्रथम वर्धापन दिन असल्याने हा वर्धापन दिन आनंदी हॉटेल कोटनाका, उरण येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

वर्षभरात वाढदिवस, पुण्यतिथी, जयंती निमित्त ज्या ज्या व्यक्तींनी सुफल आहार च्या माध्यमातून झोपडपट्टीतील मूलाना अन्नदान केले त्या सर्व व्यक्तींच्या कृतज्ञतेची जाणीव ठेवून त्या सर्व व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला.मुलांना दररोज सकस आहार वेळेत मिळावा यासाठी सारिका पाटील,प्रियांका सिंह , ईश्वरी कोंडीलकर,हंसराज चव्हाण,पप्पु सूर्यराव,सचिन उकार्डे, शिवानी कोळी, स्मिता नाखवा, सुरज सिंह , विकास शर्मा, प्रसाद पाटील,पत्रकार विठ्ठल ममताबादे,ममता समेळ,ईश्वरी कोंडीलकर,साहिल पाटील,खूशबू चाहार यांच्यासह सुफल आहाराची संपूर्ण टीम रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.यांचा कार्याचा गौरवही यावेळी करण्यात आला.

व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले साई मंदिर वहाळचे संस्थापक तथा सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, रायगड भूषण राजू मुंबईकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक वाघेला, डॉ सत्या ठाकरे,भारतीय जनता पार्टी उरण शहराध्यक्ष कौशिक शहा, शिवसेना उपशहरप्रमुख गणेश पाटील, कोकण ज्ञानपीठ विद्यालयाचे प्रा. दत्ता हिंगमिरे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रसिद्ध निवेदक नितेश पंडित यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *