लोकद्दर्शन👉मोहन भारती
राजुऱ्यात अग्नीपथ योजने विरोधात काँग्रेसचे धरणे.
राजुरा :– केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेमुळे देशातील तरूणांचे भवितव्य धोक्यात आले आहे. सुशिक्षित बेरोजगारांमध्ये केंद्र सरकारच्या धोरणांबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सरकारने ही योजना तातडीने वापस घेऊन नवजवानांना त्यांच्या भविष्याची खात्री देणारी पूर्वीचीच सैन्य भरती प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी तहसील कार्यालय राजुरा येथील काँग्रेसच्या एकदिवसीय धरणे आंदोलन प्रसंगी केली.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्या आदेशानुसार आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनात धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच या मागणीचे निवेदन तहसीलदार हरिष गाडे यांच्या मार्फत भारताचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविद यांना पाठविण्यात आले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, कविता उपरे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, शहराध्यक्ष संतोष गटलेवर, संध्या चांदेकर, दिनकर कर्णेवार, माजी जि प सदस्य मेघाताई नलगे, माजी सभापती कुंदाताई जेणेकर, मुमताज जावेद, सं गां नि योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, माजी नगरसेवक हरजितसिंग संधू, गजानन भटारकर, माजी प स सदस्य तुकाराम मानुसमारे, जंगु पा मडावी, अल्पसंख्यक विभाग अध्यक्ष सय्यद सकावत अली, राजुरा यु. काँ. अध्यक्ष मंगेश गुरणुले, कार्याध्यक्ष एजाज अहमद,शहराध्यक्ष अशोक राव, प्रभाकर येरणे, अजय रेड्डी, शंकर बोंकुर, भाग्यश्री आत्राम, सोनू सिंग, चंद्रपुर्ना पेद्दी, राधेश्याम कुरमावार, राकेश रामटेके, ताजुद्दिन शेख, राजु पिंपळशेंडे, अॅड. रामभाऊ देवईकर, रामभाऊ ढुमने, विनोद झाडे, अब्दुल जमीर, अब्दुल जावेद, शब्बीर पठाण, उमेश गोरे, प्रणय लांडे, विकास देवाळकर, अमित टेकाम, विजय उपरे, राजाराम येल्ला, अनंता एकडे, सय्यद साबीर, मंजुषा खंडाळे, संगीता हिवराडे, रेखा लिंगे, पूनम गिरसाळवे, योगिता भोयर, अर्चना गर्गेलवार, शुभांगी खामनकर, धनराज चिंचोलकर, कवडु सातपुते, इर्शाद शेख, चेतन जयपुरकर, विनोद कावडे , आकेश चोथले यासह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आणि युवक, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.